सेलिब्रिटी मंडळी कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससह संवाद साधतात. सोशल मीडियावर आपल्या सिनेमांच्या प्रमोशनपासून ते स्वतःच्या जीवनातील गोष्टींची माहिती सेलिब्रिटी सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार मंडळी आपल्या जीवनातील काही सुखद आणि खास क्षणसुद्धा रसिकांसह शेअर करतात. 

आगामी वेब सिरीज "मैं हीरो बोल रहा हू " स्टार, अर्सलन गोनीने अल्पावधीतच रसिकांचे मनं जिंकली आहेत. त्याच्या आधीच्या “हक से 2” आणि “जिया और जिया” चित्रपटातील त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती. अलीकडेच अर्सलन गोनी यांनी उघड केले कि “दिल से” मधील शाहरुख खानच्या अभिनयाने प्रेरित होऊन ऍक्टर होण्याचे ठरवले होते. शाहरुख खानमुळे तो अभिनय क्षेत्रात आला आणि अभिनेता बनला. योगायोगाने त्याला संधी देखील मिळाल्या. त्यामुळे आगामी काळात तो अधिक चांगले काम करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे.  

फिटनेसबाबत सजग असलेला अर्सलन जिममध्ये घाम गाळत असल्याचे या फोटोत पाहायला मिळत आहे. अर्सलनची पिळदार बॉडी कुणालाही घायाळ करेल अशीच आहे. यांत अर्सलनला फिटनेस गुरू त्याला फिटनेसबाबत कानमंत्र देत असल्याचं पाहायला मिळत आहे.


सोशल मीडियावर अर्सलन गोनी खूपच सक्रिय आहे, अलीकडेच त्याने त्याचा एक वर्कआऊट व्हिडीओ शेअर केला. त्याच्या इन्स्टाग्रामवर नजर टाकल्यास तुम्हाला वर्कआऊट व्हिडीओ पाहून नक्कीच प्रेरणा देईल हे मात्र नक्की. तुर्तास नवीन शेअर केलेल्या व्हिडीओत अर्सलान गोनी ट्रॅप बारसह डेडलिफ्ट करताना दिसत आहे.

 

एक अभिनेता म्हणून अर्सलान गोणी  फिट राहणे खूप महत्वाचे आहे हे त्याला चांगलेच माहीती आहे. त्यामुळे त्याच्या फिटनेसकडे तो प्रंचड लक्ष देतो. त्यावर मेहनत घेतो. त्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून विशेष म्हणजे लाईक करणा-यांमध्ये तरुणींची संख्या जास्त आहे. त्यामुळे दिवसेंदिवस त्याच्या फॉलोअर्सच्याही संख्येत वाढ होत आहे. 

आगामी काळात अर्सलन गोनी एकता कपूर निर्मित वेब सिरीज  "मैं हीरो बोल रहा हू"  मध्ये दिसणार आहे ज्यात तो एका डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. या वेबसिरीजमध्ये ८० च्या दशकाचा काळ दाखवण्यात आला आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actor Arslan Goni gives a deadlift workout Like Tiger Shroff, Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.