ठळक मुद्देमेहरपासून कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर आता अर्जुन गर्लफ्रेन्ड ग्रॅबिएलासोबत लग्न करणार, असे मानले जात आहे.  

अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर जेसिका या जोडप्याचा 21 वर्षांचा संसार अखेर संपुष्टात आला. अर्जुन व मेहर यांनी सामंजस्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. यानंतर कौटुंबिक न्यायालयाने मंगळवारी दोघांचा घटस्फोट मंजूर केला.
मुख्य न्यायाधीश शैलजा सावंत यांनी विवाह कायद्याअंतर्गत दोघांचा घटस्फोटाचा अर्ज मान्य केला.

अर्जुन व मेहर यांनी 30 एप्रिल 2019 रोजी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. सहा महिन्यानंतर दोघांनाही कायदेशीर घटस्फोट देण्यात आला.

अर्जुन व मेहर यांना दोन मुली आहेत. घटस्फोटानंतर या दोन्ही मुली त्यांच्या आईकडे म्हणजेच मेहरकडे राहतील.
2011 पासून अर्जुन व मेहर यांच्या संसारात कुरबुरी सुरु झाल्या होत्या. अखेर 2018 मध्ये दोघांनीही एकमेकांपासून विभक्त होत असल्याचे जाहिर केले होते. यानंतर अर्जुन भाड्याच्या घरात शिफ्ट झाला होता. 1998 मध्ये अर्जुन व मेहर यांचे लग्न झाले होते. लग्नाच्या 20 वर्षांनंतर 28 मे 2018 रोजी दोघींनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

मेहरपासून कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर आता अर्जुन गर्लफ्रेन्ड ग्रॅबिएलासोबत लग्न करणार, असे मानले जात आहे.  अर्जुन व ग्रॅबिएला दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. नुकताच ग्रॅबिएलाने अर्जुनच्या मुलाला जन्म दिला.

मेहरसोबत बिनसले असतानाच अर्जुन गॅ्रबिएलाच्या प्रेमात पडला होता. 2009 मध्ये आयपीएल आॅफ्टर पार्टीदरम्यान दोघांची भेट झाली होती. हळूहळू दोघांत मैत्री झाली आणि नंतर प्रेम. जेसिकापासून विभक्त झाल्यावर अर्जुन ग्रॅबिएलासोबत लिव्ह इनमध्ये राहू लागला.  ग्रॅबिएला एक आफ्रिकी मॉडेल आहे. ह्यसोनाली केबलह्ण या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता.
 

Web Title: actor arjun rampal and mehr jesia get divorced details inside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.