बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन बऱ्याच कालावधीपासून बॉलिवूडमधून गायब होता. मात्र आता तो लवकरच अजय देवगणच्या चित्रपटात झळकणार आहे. या आगामी चित्रपटाचे नाव ‘द बिग बुल’. या सिनेमाचे दिग्दर्शन कूकी गुलाटी करणार आहे. अभिषेकने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या आगामी चित्रपटाची माहिती चाहत्यांना दिली आहे.

अभिषेक बच्चनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत म्हटलं की, “एका नवीन प्रवासाला सुरुवात करतो आहे आणि मला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे. या चित्रपटात अभिषेकबरोबर अभिनेत्री इलियाना डिक्रूझदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.


द बिग बुल सिनेमाची कथा १९९० ते २००० दरम्यान भारतात होणाऱ्या आर्थिक घडामोडींवर आधारीत आहे. अजय देवगन आणि अभिषेक बच्चन यांनी याआधी २०१२ साली प्रदर्शित झालेल्या बोल बच्चन या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा एक कॉमेडी चित्रपट होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहीत शेट्टी याने केले होते. ‘द बिग बुल’ या चित्रपटाच्या निमित्ताने आत पुन्हा एकदा अभिषेक व अजय देवगन एकत्र काम करताना दिसणार आहेत.


अभिषेक बच्चनने २००० साली रिफ्युजी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांची इतकी दाद मिळाली नव्हती.

त्यानंतर त्याने दोस्ताना, बंटी और बबली, सरकार, बोल बच्चन व कभी अलविदा ना कहना यांसारख्या हिट सिनेमांमध्ये काम केलं. धूम २ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चनने एकमेकांना डेट करायला सुरूवात केली. ते दोघं गुरू, कुछ ना कहो व ढाई अक्षर प्रेम के या चित्रपटात झळकले आहेत.

 २००७ साली अभिषेक व ऐश्वर्या लग्नबेडीत अडकले.


Web Title: Abhishek Bachchan is set to begin shooting in a biopic
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.