abhishek bachchan reveals how rishi kapoor followed gossip website to keep tabs on son ranbir kapoor | ऋषी कपूर रणबीरवर अशी ठेवायचे पाळत, अभिषेक बच्चनने सांगितलेला किस्सा वाचून बसेन धक्का

ऋषी कपूर रणबीरवर अशी ठेवायचे पाळत, अभिषेक बच्चनने सांगितलेला किस्सा वाचून बसेन धक्का

ठळक मुद्देऋषी कपूर व अभिषेक बच्चनने दिल्ली 6 आणि आॅल इज वेल या सिनेमात काम केले आहे.

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे अनेक सुपरहिट सिनेमे, त्यांचे अनेक किस्से आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत. अलीकडे  अभिषेक बच्चनने (Abhishek Bachchan) ऋषी कपूर यांच्याबद्दलचा असाच एक किस्सा ऐकवला.  दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आपल्या मुलावर म्हणजेच रणबीरवर ( Ranbir Kapoor)  कशाप्रकारे पाळत ठेवायचे याबद्दल त्याने सांगितले.

फिल्म कॅम्पेनियन या वेबसाईटला दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेकने हा किस्सा ऐकवला, अभिषेकने सांगितले, ‘ आम्ही शिमल्यात शूटींग करत होतो. सकाळच्या कॉफीसाठी मी ऋषी कपूर यांच्या खोलीत गेलो. ऋषी कपूर लूंगी घालून आणि चष्मा लावून कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर काहीतरी पाहत होते. दूरनही ते मला खूप क्यूट वाटले. पण ते कॉम्पुटरवर काय बघत आहेत, हे मला कळेना. मी कुतूहलाने त्यांना विचारले. तेव्हा त्यांनी मला एका सेलिब्रिटी गॉसिप वेब साईटचे नाव सांगितले. मी स्वत: कधीही त्या वेबसाईटचे नाव ऐकले नव्हते. या साईटवर तुम्ही काय पाहताय? असे मी त्यांना विचारले आणि यावर त्यांचे उत्तर ऐकून अवाक् झालो.  मी रणबीरवर नजर ठेवतोय. या अशा गॉसिप वेबसाईटद्वारे मी त्याच्यावर पाळत ठेवतो, असे ते म्हणाले. त्यांचे ते उत्तर ऐकून मी हातभर उडालोच. हा माणूस कमाल आहे, मनात येईल ते करतो, असे मी मनातल्या मनात म्हणालो.

तुम्हाला ठाऊक असेलच की, ऋषी कपूर व अभिषेक बच्चनने दिल्ली 6 आणि आॅल इज वेल या सिनेमात काम केले आहे. अभिषेकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर नुकताच त्याचा ‘बिग बुल’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. यानंतर तो ‘दसवी’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात तो एका राजकारण्याची भूमिका साकारणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: abhishek bachchan reveals how rishi kapoor followed gossip website to keep tabs on son ranbir kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.