Abhishek Bachchan is keen to work with 'this' director | अभिषेक बच्चन 'या' दिग्दर्शकासोबत काम करण्यास उत्सुक
अभिषेक बच्चन 'या' दिग्दर्शकासोबत काम करण्यास उत्सुक

ठळक मुद्देअभिषेक बच्चनचा मनमर्जिया सिनेमात नुकताच रिलीज झाला आहे.अभिषेकने यात रॉबी नामक शिख युवकाची भूमिका साकारली आहे

बॉलिवूड निर्माते आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी गेल्या अनेक दिवसापांसून साहिर लुधियानवी यांच्या बायोपिकच्या तयारीला लागले आहेत. दोन वर्षांपूर्वी साहिर यांच्या बायोपिक संदर्भात भन्साळी यांनी अभिषेक बच्चनसोबत मीटिंग केली होती. मात्र त्यानंतर तो प्रोजेक्ट थंड पडला. 


नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, ''अभिषेक म्हणाला, गेल्या दोन वर्षांपूर्वी संजय लीला भन्साळी यांनी साहिर लुधियानवी यांच्या बायोपिकबाबत माझाशी चर्चा केली होती मात्र त्यानंतर पुढे काहीच झाले नाही. कदाचित ते त्यांच्या दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये बिझी झाले. मी आता नक्कीच त्यांच्याशी यासंदर्भात बोलणार आहे की, मला त्या सिनेमाची कथा खूप आवडली होती आणि मला यात काम करायचे आहे.   


साहिर लुधियानवी यांच्या बायोपिकमध्ये काम करण्यासाठी इरफान खानसुद्धा उत्सुक होता. इरफानने स्वत: सांगितले होते की, साहिर साहेबांची भूमिका ज्या जिवंतपणे मी पडद्यावर मांडू शकतो त्यासुंदरतेने ती कोणीच नाही साकारु शकत. भन्साळी यांनी दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्राशीदेखील बोलणे केले होते. मिळालेल्या माहितीनुसार दीपीका पादुकोणला अमृता प्रीतम यांची भूमिका ऑफर करण्यात आली होती.    


अभिषेक बच्चनचा मनमर्जिया सिनेमात नुकताच रिलीज झाला आहे. ‘मनमर्जियां’ या चित्रपटात अभिषेक बच्चन, तापसी पन्नू आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत आहेत. अभिषेकने यात रॉबी नामक शिख युवकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तापसीने रूमी नावाच्या एका पंजाबी मुलीची भूमिका साकारली आहे. विक्की तिच्यावर जिवापाड प्रेम करतो. 

Web Title: Abhishek Bachchan is keen to work with 'this' director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.