Abcd fame actor kishore shetty arrested by ccb in drug case | ड्रग्सप्रकरणी आणखी एक अभिनेता जाळ्यात, ABCD फेम किशोर शेट्टीला अटक

ड्रग्सप्रकरणी आणखी एक अभिनेता जाळ्यात, ABCD फेम किशोर शेट्टीला अटक

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स अँगलसमोर आल्यानंतर एनसीबीचा तपास सुरु आहे. आतापर्यंत एनसीबीने अनेक लोकांना अटक केली आहे. दुसरीकडे सिटी क्राईम ब्राँच पोलीस (CCB)ने शनिवारी ड्रग्स प्रकरणात किशोर अमन उर्फ किशोर शेट्टीला अटक केली आहे. किशोर शेट्टीवर ड्रग्स ठेवल्याचा आरोप आहे आणि याप्रकरणी त्याची चौकशी सुरु आहे. 

अभिनेता किशोर शेट्टीला अटक 
किशोर शेट्टी एक प्रसिद्ध डान्सर आहे आणि त्याने रेमो डिसुझाच्या ABCD सिनेमात काम केले आहे. त्याने डान्स इंडिया डान्स या रिअॅलिटी शोमध्ये देखील सहभाग घेतला होता. त्यानंतर तो चर्चेत आला होता. 

अलीकडेच सुशांत प्रकरणाशी संबंधित ड्रग्स प्रकरणात एनसीबीला आणखी एक यश मिळालं आहे. एनसीबीने विश्राम नावाच्या ड्रग्स पेडलरला एक किलो चरससहीत अटक केली आहे. या गोष्टीची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्याने दिला. 

एनसीबीने सांगितले, हिमाचल प्रदेशमधील ड्रग्स पेडलर राहिल विश्रामला 1 किलो चरससह ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 4.5 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित इतर पेडलर्सशी तो थेट जुळलेला आहे. विश्रामच्या चौकशीतून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

आरोपींचे अर्ज फेटाळले
मिरांडा, सावंत व ड्रग विकणारा अब्दुल बसित परिहार या तिघांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. सारंग कोतवाल यांच्यापुढे या याचिकांवर सुनावणी होती. गेल्या आठवड्यात विशेष न्यायालयाने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक, मिरांडा, सावंत, परिहार आणि झैद विलत्रा व अन्य आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. एनसीबीने त्यांच्या जामीन अर्जावर आक्षेप घेताना म्हटले की, या सर्व आरोपींना त्यांचा ड्रग्स विकत घेण्यात व त्यासाठी पैसे उपलब्ध करण्यामध्ये त्यांची असलेली भूमिका महत्त्वाची आहे.काही आरोपींकडे ड्रग्स आढळले नाही. तर ज्या आरोपींकडून ड्रग्स जप्त करण्यात आले त्यांच्याकडे अत्यल्प प्रमाणात ड्रग्स होते. त्यामुळे या आरोपींना जामीन मिळू शकतो, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Abcd fame actor kishore shetty arrested by ccb in drug case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.