ऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन आज ८ वर्षांची झाली आहे. या निमित्ताने बच्चन कुटुंब सेलिब्रेशन करते. आराध्याच्या वाढदिवसानिमित्त काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये आराध्या हुबेहूब ऐश्वर्यासारखी दिसते आहे.  

फोटोमध्ये आराध्याचे हेअरस्टाईल आई ऐश्वर्यासारखीच केली आहे आणि तिने हेअरबॅण्ड लावलेला दिसतो आहे. दोघांनी गुलाबी रंगाचे कपडे परिधान केले आहेत. आराध्या व ऐश्वर्या यांचे फोटो पाहून हैराण झालेत आणि दोघांची तुलना करू लागले होते. ऐश्वर्या आणि अभिषेक यांची लाडकी आराध्या बॉलिवूडमधील लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. 


बच्चन कुटुंबाची नात असल्यामुळे चाहत्यांना आराध्यादेखील अभिनेत्री होणार का, हा प्रश्न पडत असतो. नुकतेच ऐश्वर्याला आराध्यासोबत काम करण्याबाबत विचारले असता तिने सांगितलं की, मला माहित नाही की मी व माझ्या मुलीच्या बाबतीत जीवनात काय लिहिलेलं आहे. आम्ही प्रत्येक क्षण जगण्याचा प्रयत्न करत असतो आणि एकत्र काम करण्याची गोष्ट ते पुढे पाहता येईल.


ऐश्वर्या नेहमी आराध्याचा हात पकडून असते. त्यामुळे बऱ्याचदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. आराध्या मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत शिकते आहे. ऐश्वर्या कित्येकदा आराध्यासोबत शाळेतील फंक्शनसाठी जाते व मुलीला चिअरअप करताना दिसते.

इतकंच नाही तर ऐश्वर्या स्वतः आराध्याला शाळेतून आणायला जाते.

Web Title: Aaradhya Bachchan Photos Look Like Mother Aishwarya Rai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.