बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'लाल सिंग चड्ढा'मध्ये अभिनेत्री करीना कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच तिचा या चित्रपटातील फर्स्ट लूक लीक झाला होता. त्यानंतर आता आमीर खानचादेखील फर्स्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोत आमीर खान लाल सिंग चड्ढा लूकमध्ये दमदार दिसतो आहे. त्याने लाइट पर्पल रंगाचा ग्रे पॅण्ट परिधान केली आहे. तसेच त्याने पर्पल रंगाची पगडीदेखील बांधली आहे. सरदार लूकमध्ये आमीर खानला ओळखणं कठीण जात आहे. सध्या या चित्रपटाचं शूटिंग चंदीगढमध्ये सुरू आहे.


करीना कपूरचा या चित्रपटातील फोटो लीक झाला आहे त्यात ती देसी लूकमध्ये दिसते आहे. करीना कपूरने पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. यापूर्वी करीना कपूर व आमीर खानने थ्री इडियट्स व तलाशमध्ये एकत्र काम केलं आहे. या सिनेमातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली.


लाल सिंग चड्ढा चित्रपटातून आमीर खान २ वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे. शेवटचा को ठग्स ऑफ हिंदोस्तानमध्ये झळकला होता.

लाल सिंग चड्ढा चित्रपट पुढील वर्षी क्रिसमसला प्रदर्शित होणार आहे. लाल सिंग चड्ढा चित्रपट फॉरेस्ट गंप या हॉलिवूडचा रिमेक आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अद्वैत चंदन करत आहे. 

Web Title: Aamir Khan's Lal Singh Chaddha Movie look viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.