बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान हा सध्या त्याची लेक इरा खान हिच्या पदार्पणामुळे चर्चेत आहे. इरा खान ही नाटक दिग्दर्शित करत आहे. त्याशिवाय ती सोशल मीडियावर पण अ‍ॅक्टिव्ह आहे. तिने नुकताच सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती घराच्या बिल्डींगवर झोपलेली दिसतेय. या फोटोला युजर्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. युजर्स म्हणाले,‘जरा सांभाळून..’,‘ बिल्डींगवरून पडू नकोस..’

आमिर खानची मुलगी इरा खान ही भलतीच अ‍ॅक्टिव्ह दिसते. तिने नुकताच पोस्ट केलेला फोटो चांगलाच चर्चेत आहे. या फोटोत ती घराच्या बिल्डींगवर झोपलेली दिसतेय. तिने शॉर्ट्स घातले असून कानात हेडफोन घालून गाणे ऐकताना दिसत आहे. तिने या फोटोला कॅप्शन दिले आहे की, मला माझ्या घराची गच्ची खूप आवडते. सिमेंट गरम आहे आणि सुटलेला थंड वारा तसेच हा निसर्ग मला नेहमीच प्रेमात पाडतो.. हॅप्पी वीकेंड.’ इराचा हा फोटो फॅन्सना खूप आवडलेला दिसतोय. १२ हजारांपेक्षा जास्त युजर्सने हा फोटो लाईक केला आहे. युजर्सनी इराला कमेंट करताना ‘सुंदर’ अशी कमेंट दिली. तसेच काहींनी इराला ट्रोल करणेही सुरू केले. एकाने लिहिले की,‘जरा सांभाळून पडशील’

इरा खानच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, इरा खान ही बॉलिवूडमधील पदार्पणाच्या चर्चेत आहे. तिच्या नाटकाचे नाव ‘युरिपिड्स मेडिया’ असे आहे. या नाटकाच्या मुख्य भूमिकेत इराने युवराज सिंहच्या पत्नीला घेतले आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Aamir Khan's daughter photo shared, The users said, 'Be careful'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.