ठळक मुद्देइरा आमिर खानसारख्या सुपरस्टार्सची मुलगी आहे. परंतु अशातही ती लो-प्रोफाइल राहून काम करणे पसंत करते.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याची लाडकी लेक इरा सध्या जाम चर्चेत आहे. होय, इराच्या लव्ह रिलेशनशिपची चर्चा सध्या सर्वत्र रंगलीय. गेल्या काही दिवसांपासून इरा मिशाल कृपलानीला डेट करतेय, अशी चर्चा आहे. खरे तर या चर्चेला स्वत: इरानेच खतपाणी घातले. इराने मिशालसोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर केले आणि तिच्या व मिशालच्या लव्हलाईफच्या बातम्या माध्यमांत उमटू लागल्या. अद्याप इराने या बातम्या ना स्वीकारल्या होत्या, ना नाकारल्या होत्या. परंतु आता तिने पहिल्यांदा यावर खुलासा केला आहे. एका ताज्या मुलाखतीत ती यावर बोलली.


‘मी माझ्या लव लाईफबद्दल अद्याप कुठलाही खुलासा केलेला नाही. केवळ मला जे पोस्ट करायचे ते मी केले. मी ख-या आयुष्यात जितकी खरी आहे, तितकेच माझे सोशल अकाऊंट  खरे असावे, असे माझे मत आहे. मला ज्या ज्या क्षणी जे काही पोस्ट करावेसे वाटले, ते मी केले,’असे इरा म्हणाली.
लव्ह लाईफचा खुलासा करण्याबद्दल तुझे मत काय? असे विचारले असता, ते प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून आहे. तुम्ही खºया आयुष्यात कसे आहात, यावर ते अवलंबून आहे.  तुम्हाला स्वत:बद्दल सांगायचे नसेल तर सांगू नका. माझ्याबाबतीत म्हणाल तर, मी ना अधिक जास्त उघड करते, ना लपवते, असे ती म्हणाली.


इराच्या करिअरबद्दल सांगायचे झाल्यास, तिला फिल्ममेकिंगमध्ये रस आहे. अलीकडे आमिरने याबद्दल माहिती दिली होती. मुलगी इराला फिल्ममेकिंगमध्ये आणि मुलगा जुनैद याला अ‍ॅॅक्टिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा असल्याचे तो म्हणाला होता.

इरा आमिर खानसारख्या सुपरस्टार्सची मुलगी आहे. परंतु अशातही ती लो-प्रोफाइल राहून काम करणे पसंत करते. तिला तिच्या टीमबरोबर अतिशय सहजपणे रहायला आणि त्यांच्यात मिसळायला आवडते. स्वत:ला ‘स्टार डॉटर’ म्हणवून घेणे पसंत नाही. ती टीममधील अन्य सदस्यांप्रमाणेच मेहनत करण्यावर भर देते.  

Web Title: aamir khans daughter ira khan finally opens up on her love life with mishaal kirpalani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.