ठळक मुद्देजाहिरात विश्वात सध्या विकी कौशल सगळ्यांत लोकप्रिय चेहरा आहे.

वेगवेगळे सेलिब्रिटी वेगवेगळ्या ब्रँडच्या जाहिराती करताना दिसतात. एखादा ‘खान’ क्रिमची जाहिरात करतो तर दुसरा ‘खान’ मोबाईल. एखादी हिरोईन बिस्किटांची जाहिरात करते तर दुसरी लिपस्टिकची. या जाहिरातींसाठी स्टार्सला कोट्यवधी रूपये मिळतात, हे तर आपण जाणतोच. पण नेमके कोणता स्टार्स किती पैसे घेतो, हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसणार. ऐकून आश्चर्य वाटेल पण ब्रँड एंडोर्समेंटमधून होणा-या स्टार्सच्या कमाईची यादी बनवली तर यात आमिर खान टॉपवर असेल.

होय, बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान कुठलेही प्रॉडक्ट एंडोर्स करण्यासाठी 11 कोटी रूपये घेतो. तर शाहरूख खान एका ब्रँडच्या जाहिरातीसाठी 9 कोटी रूपये घेतो. अमिताभ बच्चन या यादीत तिस-या क्रमांकावर येतात. एका जाहिरातीसाठी ते 8 कोटी घेतात. 

‘भास्कर’ने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय कुमार 7 कोटी, सलमान खान 7 कोटी, विकी कौशल 3 कोटी, टायगर श्रॉफ 2.50 कोटी, आयुष्यमान खुराणा 2.25 कोटी, राजकुमार राव 1.50 कोटी रूपये घेतो.

जाहिरात विश्वात सध्या विकी कौशल सगळ्यांत लोकप्रिय चेहरा आहे. याचे कारण म्हणजे, त्याचा शांत व साधा-भोळा स्वभाव. अ‍ॅड गुरु प्रल्हाद कक्कड यांच्या मते, विकी अतिशय शांत आणि अगदी साधा स्टार आहे. त्यामुळे तो अ‍ॅड इंडस्ट्रीचा सध्याचा सर्वांत आवडता चेहरा आहे. ‘उरी’ या चित्रपटानंतर त्याची मागणी कमालीची वाढली आहे.


Web Title: aamir khan is taking 11 crores for an advertisement salman khan is charging 7 crores
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.