बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा आगामी चित्रपट 'लाल सिंग चड्ढा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट हॉलिवूडचा क्लासिक चित्रपट 'फॉरेस्ट गंप'चा अधिकृत रीमेक आहे. व्हॅलेंटाइन्स डेच्या निमित्ताने आमिर खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एका मेसेजसोबत करीना कपूरचा लूक प्रसिद्ध केला आहे. 

आमिर खानने सोशल मीडियावर 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटाचे पोस्टर शेयर करून लिहिले की, 'पा लेने की बेचैनी, और खो देने का डर.. बस इतना सा है, ज़िंदगी का सफर'.


आमिर खानला 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटासाठी बऱ्याच ट्रांसफॉर्मेशन्समधून जावे लागले ज्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. आमिर खान हा असा अभिनेता आहे, जो चित्रपटातील आपल्या भूमिकेच्या तळाशी जात आपल्या अधिकतम क्षमतेसोबत तिच्याशी समरस होण्यासाठी ओळखला जातो. मग ती चित्रपटातील व्यक्तिरेखा असो किंवा तिचा लुक, हा अभिनेता प्रत्येक वेळी सर्व काही परफेक्शनसोबत सादर करण्यावर भर देत असतो.

टॉम हँक्सचा क्लासिक रीमेक, 'लाल सिंग चड्ढा'देखील याच गोष्टींमुळे चाहत्यांच्या कुतूहलाचा विषय बनला आहे. या चित्रपटाला अधिक वास्तविकता देण्यासाठी, वास्तविक जागांवर या चित्रपटाचे शूटिंग होत आहे. 


अतुल कुलकर्णी द्वारा लिखित 'लाल सिंग चड्ढा' चित्रपट अद्वैत चंदन द्वारा दिग्दर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट २०२०च्या ख्रिसमसच्यावेळी रिलीज होणार आहे.

Web Title: Aamir Khan shared Kareena Kapoor's look from 'Lal Singh Chaddha' Movie, along with his message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.