ठळक मुद्देआमिरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे लवकरच त्याचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

आमिर खानला (Aamir Khan) उगाच बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट म्हणत नाही. आमिर जे काही करतो तो जीव तोडून करतो. प्रत्येक भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतो. आता हेच बघा ना, एका सीनसाठी आमिरने चक्क 12 दिवस आंघोळ केली नाही. होय, विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे.
तर हा सीन होता आमिर व राणी मुखर्जीच्या ‘गुलाम’ (Ghulam) या सिनेमाचा. या सिनेमातील क्लायमॅक्स सीन पाहताना आजही अंगावर रोमांच येतात. 10 ते 12 दिवस या क्लायमॅक्स सीनचे शूटींग सुरु होते. (Ghulam Aamir Khan Climax Fight Scene)

या फाईट सीनमध्ये आमिर विलनकडून मार खातो. पडद्यावर आमिरचा रक्ताने माखलेला चेहरा आणि अंगभर झालेल्या जखमा पाहून चाहतेही हळहळले होते. या जखमा आणि क्लायमॅक्स सीनचा हा लूक मेन्टेन करण्यासाठी आमिरने 12 दिवस आंघोळ केली नव्हती.
12 दिवस आंघोळ न केल्याने आमिरची अवस्था काय झाली असावी, याचा अंदाज तुम्ही बांधू शकताच. पण सीनसाठी, चित्रपटासाठी आमिरने ते सगळं सहन केले.

आंघोळ केली तर मेकअप बिघडला असता, जखमांच्या खूणा, रक्ताचे डाग सगळेच पुन्हा नव्याने तंतोतंत मॅच करणे कठीण गेले असते, म्हणून आमिरने आंघोळ न करण्याचा निर्णय घेतला आणि सीन पूर्ण होईपर्यंत या निर्णयावर ठामही राहिला. आमिरला ‘परफेक्शनिस्ट’ म्हणतात ते म्हणूनच.

आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी आमिर अशीच मेहनत घेतो. ‘दंगल’ या सिनेमासाठी आमिरने आधी प्रचंड वजन वाढवले होते. यानंतर याच सिनेमातील पुढच्या टप्प्यासाठी हे वजन घटवले होते.
आमिरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे लवकरच त्याचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिनेमात आमिर एका आगळ्यावेगळ्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यात करिना कपूर त्याच्या अपोझिट दिसणार आहे.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: aamir khan did not bath for 12 days just for this scene of film gulam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.