ठळक मुद्देइरा ही आमिर आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आहे.

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान याची मुलगी इरा तशी कॅमे-यांपासून दूर राहणे पसंत करते. पण सोशल मीडियावर मात्र ती कमालीची सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे असंख्य चाहते आहेत. काही दिवसांपूर्वी इरा तिच्या बॉयफ्रेन्डमुळे चर्चेत आली होती.  यांनतर तिच्या हॉट फोटोशूटने इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. आता इरा एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. होय, या व्हिडीओत इरा जमिनीवर लेटलेली असून मदत मागतांना दिसतेय. जणू इरा एखाद्या चित्रपटाचा सीन समजावून सांगतेय, असे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर भासतेय.  

हा एक बूमरँग व्हिडीओ आहे. इराने स्वत: आपल्या सोशल अकाऊंटवर तो शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत ती लिहिते, ‘मी अ‍ॅक्टिंगमध्ये फार चांगली नाही. स्वभावाने मी लाजाळू आहे. म्हणूनच मी अ‍ॅक्टिंगच्या फंदात पडले नाही. कारण मला अ‍ॅक्टिंग करायचीच नव्हती. पण तुम्हाला दिग्दर्शक व्हायचे असेल तरीही तुम्हाला वेळोवेळी अ‍ॅक्टिंग करावी लागते. असे करताना मला माझ्यातील सर्व कसब पणाला लावावे लागते. कधी कधी सगळे मॅनेज होते. कधी कधी नाही.’


तुम्हाला ठाऊक असेलच की, इराने दिग्दर्शन क्षेत्रात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. इरा ज्या नाटकाचे दिग्दर्शक करणार आहे ते ग्रीकमधील एका पौराणिक कथेवर आधारित आहे. यूरिपिड्स मेडिया असे या नाटकाचे नाव आहे. या नाटकात युवराज सिंगची पत्नी हेजल कीच मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

इरा ही आमिर आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आहे. त्याशिवाय या दोघांना जुनैद खान नावाचा एक मुलगाही आहे.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: aamir khan daughter ira khan share of her acting video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.