ठळक मुद्देखुद्द आमिर खान जायनला लॉन्च करणार आहे. जायनचा पहिला चित्रपट आमिरचा भाचा व अभिनेता इमरान खान दिग्दर्शित करणार आहे.

अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान हिला अ‍ॅक्टिंगमध्ये म्हणजे अभिनेत्री होण्यात काहीही इंटरेस्ट नाही. तिला रस आहे तो चित्रपट दिग्दर्शनात. आमिरचा मुलगा जुनैद हाही थिएटरमध्ये बिझी आहे. चित्रपटांपेक्षा त्याला थिएटरमध्ये अधिक रस आहे. पण आमिरच्या कुटुंबातील एक मुलगी मात्र अभिनेत्री होण्यास सज्ज झाली आहे. होय, तिचे नाव जायन मरी खान (zayn marie khan). ही कोण तर आमिरची पुतणी. म्हणजेच आमिरचा भाऊ मन्सूर खान याची मुलगी. जायन लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार, असे कळतेय.

जायन मरी खानने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोत चित्रपटाची स्क्रिप्ट दिसतेय. यावरून जायनच्या डेब्यूची तयारी सुरु झाली, असे मानले जात आहे. याशिवाय जायनने एका न्यूज पेपरच्या कटिंगचा फोटोही शेअर केला आहे. यात जायनच्या बॉलिवूड डेब्यूसंबंधित बातमी आहे.


 जायन ही सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. यापूर्वी तिने दिग्दर्शक शकुन बत्रा यांच्यासोबत ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ या चित्रपटासाठी अस्टिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम केले.


मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार, खुद्द आमिर खान जायनला लॉन्च करणार आहे. जायनचा पहिला चित्रपट आमिरचा भाचा व अभिनेता इमरान खान दिग्दर्शित करणार आहे. इमरानने अभिनेता म्हणून फिल्मी करिअर सुरु केले. पण अ‍ॅक्टिंगच्या दुनियेत त्याला यश मिळाले नाहीत. त्यामुळेच आता तो दिग्दर्शन क्षेत्रात नशीब आजमावतो आहे. काही दिवसांपूर्वी ‘मिशन मार्स’ नामक शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन करत त्याने दिग्दर्शन क्षेत्रात डेब्यू केला. आता तो जायनचा डेब्यू चित्रपट दिग्दर्शित करणार आहे.


Web Title: aamir khan beautiful niece zayn marie khan not daughter ira khan to make bollywood debut
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.