Aamir khan and elli avrram song har funn maula first look released | आमिर खान आणि एली अवरामचं गाणं 'हरफनमौला'चा फर्स्ट लूक आऊट, पाहा रोमाँटिक फोटो

आमिर खान आणि एली अवरामचं गाणं 'हरफनमौला'चा फर्स्ट लूक आऊट, पाहा रोमाँटिक फोटो

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान आणि अभिनेत्री एली अवरामच्या डान्स व्हिडिओची पहिली झलक समोर आली आहे. एली अवरामने इन्स्टाग्रामवर नव्या गाण्यातील लूक शेअर केले आहे, ज्यात आमिरसोबत एका वेगळ्या स्टाईलमध्ये दिसते आहे.  काही दिवसांपूर्वी त्यांच्या नवीन डान्स नंबरचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोघेही डान्स करताना दिसत होते.

या फोटोमध्ये एली आवराम आणि आमिर खान रोमँटिक स्टाईलमध्ये दिसतायेत. दोघेही पोज देताना दिसत आहेत. याआधी सेटमधील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात आमिर खान आणि एली अवराम डान्स करताना दिसत होते.अल्ली अवराम करत उत्तम डान्सर आहे.  एली अवराम देखील बॉलिवूड अभिनेत्री आहे आणि ती बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसली आहे.बिग बॉसमध्ये एली  एक स्पर्धक म्हणून दिसली होती.


आगामी गाण्यात आमिर खानने स्वतःचा लूक डिझाइन केला आहे.  या गाण्याच्या शुटिंगदरम्यान तो खूप मस्तीच्या मूड असल्याचा दिसत आहे.  आमिरने 'लालसिंग चड्ढा' च्या वेळापत्रकातून ब्रेक घेतला आणि जयपूरला ह्या गाण्याचे शूटिंग करण्यासाठी गेला होता. लाल सिंग चड्ढाचे शेवटचे शेड्युल यावर्षी उन्हाळ्यात कारगिलमध्ये शूट होणार आहे. हे दृश्य चित्रपटात खूप महत्त्वाचे आहेत कारण मूळ चित्रपट फॉरेस्ट गंपमधील गंपची भूमिका एका जवानाची होती. आमिर खानने या चित्रपटासाठी स्वतःमध्ये शारीरिक रुपांतरण केला आहे आणि त्यासाठी फिटनेस आणि लूक्सवर स्वतः काम केले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Aamir khan and elli avrram song har funn maula first look released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.