बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर चर्चेत आलेली अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आलिया फर्नीचरवाला सध्या हॉटनेसमुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. रेड कार्पेट पासून अवॉर्ड सोहळ्यापर्यंत सगळीकडे आलियाने तिच्या बोल्डनेसने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकतीच आलियाला मुंबईत पार पडलेल्या फेमिना ब्युटी अवॉर्ड सोहळ्यात दिसली होती. यावेळी तिचा ड्रेस व तिचा अंदाज पाहून सगळेच थक्क झाले होते. तिने त्यावेळी केलेल्या गेटअपमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.


या सोहळ्याच आलियाने पर्पल रंगाचा ट्रान्सपरेंट ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसचा गळा डीप होता आणि त्यात तिचे क्लीवेजही दिसत होतो. या ड्रेसवर तिने कमी मेकअप, न्यूड लिपस्टिक आणि मेसी हेअरस्टाईल केली होती. तिने या गेटअपमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमुळे तिला ट्रोल केलं जात आहे. 


ट्रोलर्सने कमेंटमध्ये म्हटलं की, एक सिनेमा रिलीज झाल्यानंतर हा ड्रेस आहे पुढे काय होईल.


आलियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी स्वतःच्या नावात बदल केला असून तिने आलियाचे अलाया असे केले आहे. तिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने जवानी जानेमन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

या चित्रपटात तिच्यासोबत सैफ अली खान व तब्बू मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील अलायाच्या भूमिकेचं सगळीकडून खूप कौतूक झाले होते.

Web Title: Aaliya Furniturewala was trolled by a transparent dress, see this photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.