चिट्टीयां कल्लाइयां वे म्हणत सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणारी बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस नेहमी ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. कधी बिकनी तर कधी बोल्ड आउटफिटमधील फोटो ती शेअर करत असते. नुकतेच तिने असे फोटो शेअर केले आहे, जे पाहून चाहते क्रेझी झाली आहेत. जॅकलिनने इंस्टाग्रामवर ४६ मिलियन फॉलोव्हर्स पूर्ण केले आहेत. या आनंदाच्या क्षणी जॅकलिनने टॉपलेस फोटो शेअर केले आहेत.


वयाच्या पस्तीशीत जॅकलिन फर्नांडिसने एक नाही तर तीन टॉपलेस फोटो शेअर करून खळबळ माजवली आहे. या फोटोत पांढऱ्या रंगाची थीम पहायला मिळते आहे. जॅकलीनने फोटोमध्ये सफेद रंगाची पँट घातली आहे. टॉपलेस दिसत असून हातात फुलांचा गुच्छ पकडला आहे. जॅकलिनचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून ८ लाखांहून जास्त लोकांनी पसंती दर्शवली आहे.


मूळची श्रीलंकेची असलेल्या जॅकलिन फर्नांडिसने असा फोटो पहिल्यांदा शेअर केला नाही. तर यापूर्वीदेखील तिने टॉपलेस फोटो शेअर केला आहेत. फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी जॅकलिनने टॉपलेस होऊन फोटोशूट केले होते. 


जॅकलिनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर २००८ साली तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

शेवटची ती नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या मिसेस सीरियल किलरमध्ये दिसली होती. लवकरच ती जॉन अब्राहमचा चित्रपट अटॅकमध्ये दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Aali Lahar Kela Kahar! Jacqueline went topless with 46 million followers on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.