९०च्या दशकात सेटवर ऊन व पावसापासून असा केला जायचा बचाव, खुद्द सांगतेय धक धक गर्ल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 06:00 AM2019-06-06T06:00:00+5:302019-06-06T06:00:00+5:30

माधुरी दीक्षित लवकरच कलर्स वाहिनीवरील 'डान्स दीवाने' या रिएलिटी शोच्या दुसऱ्या पर्वात एका डान्स रिएलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.

In the 90's, the rescue is done from the heat and rain on the set, Madhuri Dixit told difference | ९०च्या दशकात सेटवर ऊन व पावसापासून असा केला जायचा बचाव, खुद्द सांगतेय धक धक गर्ल

९०च्या दशकात सेटवर ऊन व पावसापासून असा केला जायचा बचाव, खुद्द सांगतेय धक धक गर्ल

googlenewsNext

नव्वदच्या दशकात आपल्या अभिनय व नृत्याच्या अदाकारीने रसिकांना भुरळ पाडणारी बॉलिवूडची धक धक गर्ल म्हणजे माधुरी दीक्षित लवकरच कलर्स वाहिनीवरील 'डान्स दीवाने' या रिएलिटी शोच्या दुसऱ्या पर्वात एका डान्स रिएलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. या शोच्या निमित्ताने एका मुलाखतीत तिने बॉलिवूडमध्ये काळानुसार घडलेल्या बदलाबद्दल सांगितले. ती म्हणाली की, काळानुसार चित्रपटात व कलाकारांमध्ये बदल पहायला मिळाला. तसेच तिने त्यावेळी ऊन व पावसापासून कसा बचाव केला जायचा हे देखील सांगितले. 

माधुरी म्हणाली की, काळाप्रमाणे चित्रपटही बदलला. त्यावेळी लोक त्यांची घरे शूटिंगसाठी भाड्याने देत होते. त्यानंतर एक वेळ असा आला की थोडा बदल करत कॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न केला. यश चोप्रा व यशराज, मुक्ता आर्ट्स, राजश्री प्रोडक्शन यांसारखे मोठे प्रोडक्शन हाऊसेस आले असून त्यांच्या बजेटनुसार चित्रपट बनवू लागले. त्यानंतर एक काळ असा आला ज्यात इंडस्ट्री नियमावर चालू लागली. निश्चित बजेट, ठरवेल्या वेळेत काम आटपायचे, कलाकारांना सोईस्कर वातावरण निर्माण केले. 


आता कलाकारांना शूटिंगच्या सेटवर खासगी व्हॅनिटी व्हॅन दिली जाते. सेटवर तेच त्यांचे घर असते. मात्र नव्वदच्या दशकात ऊन व पावसापासून कसे संरक्षण केले जात असेल, असा प्रश्न तुम्हाला पडला असले ना. याबाबत माधुरीने सांगितले आहे.

ती म्हणाली की, व्हॅनिटी व्हॅन आली.पूर्वी आम्ही उन्हापासून संरक्षण करण्यासाठी मोठ्या छत्रीखाली बसायचो. जर पाऊस आला तर गाडीत जाऊन बसायचो. तेव्हा कलाकारांकडे निवांत वेळ असायचा. आता एकाच वेळी बऱ्याच गोष्टी करावी लागते. शूटिंग करता करता सोशल मीडिया सांभाळायचे, मुलाखती आता एकाच वेळी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात.

Web Title: In the 90's, the rescue is done from the heat and rain on the set, Madhuri Dixit told difference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.