कल्कि कोचलिन सध्या आपला प्रेग्नंसी पीरियड एन्जॉय करत आहे.  तिचा 8 वा महिना सुरू झाला आहे.  सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असून प्रेग्नंसीची सगळीच माहिती ती सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच तिने बेबी बंप फ्लॉन्ट करत फोटोशूट केलं होते. या फोटोशूटमध्ये प्रेग्नंसीमुळे तिच्या चेहऱ्यावर नॅचरल ग्लोमुळे ती अधिक सुंदर दिसते आहे. यावेळी कल्कीने पेस्टल कलरमधील लाइट कलरचा आऊटफिट कॅरी केलं होतं. एक डायमंड लॉकेटसोबत लाइट मेकअपमध्ये ती खूप सुंदर दिसली होती. चाहत्यांनी या फोटोंवर अनेक लाइक्स आणि कमेंटसचा वर्षाव केला होता. 


आता तिने एक वेगळाच फोटो शेअर करत सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. बाथटबमधला हा फोटो असून  तिच्या चाहत्यांनी यावर संमिश्र प्रतिक्रीया देत असल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोला तिने समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. नेहमीप्रमाणे या फोटोतही कल्कीचा  हॉट आणि तितकाच सेक्सी अंदाज पाहायला मिळत आहे.


पहिल्यांदा गर्भातल्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकले तो क्षण मी कधीही विसरू शकणार नाही. ते सगळे रोमांचक होते. गर्भावस्थेचे पहिले तीन महिने अतिशय वाईट होते. पण आता सगळे काही ठीक आहे,असे कल्कीने दिलेल्या  एका मुलाखती मध्ये सांगितले होते. तसेच केवळ मी लग्नाआधी प्रेग्नंट आहे म्हणून आम्हाला लग्न करायचे नाही. आमच्या मुलाच्या शाळेसाठी वा कागदपत्रांसाठी गरज असल्यास आम्ही लग्नाबद्दल विचार करू. पण तूर्तास आम्ही एकमेकांशी, आमच्या प्रेमाशी वचनबद्ध आहोत आणि कुटुंबाशीही प्रामाणिक आहोत, असे कल्की म्हणाली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 8 months prganant Kalki Koechlin Shares Her Bathtub Photo When She Was Alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.