विनोद खन्ना यांचा लेक अक्षय खन्ना यानेही हिंदी चित्रपटसृष्टीतील विविध गाजलेल्या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. ‘बॉर्डर’, ‘दिल चाहता है’, ‘डोली सजा के रखना’, ‘ताल’, ‘गांधी माई फादर’, ‘हमराज़’, ‘दिवानगी’, ‘गली-गली चोर है’, ‘आ अब लौट चलें’ आणि ‘हलचल अशा चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. मात्र अक्षयच्या या भूमिकांना रसिकांकडून म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही. त्यामुळे वडील विनोद खन्ना यांच्या इतकं यश अक्षयच्या वाट्याला आलेलं नाही. आता अक्षय सेक्शन 375 सिनेमामुळे चर्चेत आहे.

 

अक्षयने अजुन लग्न केलेले नाही त्यामुळे तो कधी लग्न करेल असे प्रश्न वारंवार त्याला विचारले जातात. यावर अक्षयनेही मौन सोडले आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अक्षयने सांगितले की ''तो मॅरेज मटेरिअल नाही''. अक्षय खन्ना आता 44 वर्षाचा आहे. तरी आजपर्यंत त्याने लग्न का नाही केले? विचारल्या गेलेल्या प्रश्नावर अक्षय म्हणाला की, मला अशा प्रकारचे आयुष्य जगायचे नाही जे संपूर्ण तुमचं आयुष्यचं बदलून टाकेल. माझे आयुष्य मला माझ्यानुसार जगायला आवडते. लग्न या सगळ्या गोष्टींपासून मी स्वतःला नेहमीच लांब ठेवणे पसंत केले. 


तसेच बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रेटींनी मुलं दत्तक घेत त्यांचे पालकत्व स्विकारले आहे. त्यामुळे लग्नाचा विचार नसला तरी एखादे मुल तरी दत्तक घेणार का? यावरही त्याने आपले मत स्पष्ट केले. 'लग्न' आणि 'मुल' या दोन्ही मोठ्या जबाबदा-या आहेत. पालकत्व स्विकारल्यावरही माझे आयुष्य माझे राहणार नाही. ती एक मोठी जबाबदारी आहे. भविष्यातही मी मुल दत्तक घेईन असे वाटत नाही कारण, त्यासाठी मी सक्षम आहे असे मला अजिबात वाटत नाही.


खरंतर 'ताल' चित्रपटाच्या यशानंतर अक्षयने लग्न करण्याचा निर्णय घेतला. करिष्मावर अक्षयचं जीवापाड प्रेम होतं. त्यानं ही बाब त्यावेळी वडील विनोद खन्ना यांना सांगितली. त्यांनाही सून म्हणून करिष्मा पसंत होती. ते करिष्माच्या घरी गेले आणि रणधीर कपूर यांच्याकडे अक्षय-करिष्माच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला. करिष्माचे वडील रणधीर यांनाही हा प्रस्ताव मान्य होता. मात्र त्यांची पत्नी बबिताला हे मान्य नव्हतं. त्यांना करिष्मा आणि अभिषेक बच्चन यांचं लग्न व्हावं असं वाटत होतं.

मात्र करिष्माला अभिषेक पसंत नव्हता. अक्षय आणि अभिषेक या दोघांनाही सोडून तिने बिझनेसमन संजय कपूरचा हात धरला. मात्र दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. दोघं काडीमोड घेऊन वेगळे झालेत. मात्र तिकडे अक्षयचे आजही करिष्मावर  आजही जीवापाड प्रेम आहे.  त्यामुळे फिल्मी प्रेमकहाणी वाटावी अशी अक्षयची रिअल प्रेमाची कहाणी आहे. अजूनही त्याला खऱ्या प्रेमाची  प्रतीक्षा आहे असेच म्हणावे लागेल.  


Web Title:  44-year-old Akshay Khanna Not Tying The knot Or Adopting Kids
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.