ठळक मुद्देअगदी अलीकडे करमाला मोडेक्स या 45 वर्षांच्या महिलेने अनुराधा पौडवाल यांची मुलगी असल्याचा दावा केला होता.

ऐश्वर्या राय बच्चन बॉलिवूडच्या सर्वाधिक प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. तूर्तास ऐश्वर्याने एकही चित्रपट साईन केलेला नाही. पण असे असले तरी तिची चर्चा मात्र जोरात आहे. होय, कारणही खास आहे. एका  तरूणाने ऐश्वर्या आपली आई असल्याचा दावा केला आहे.
काही दिवसांपूर्वी केरळच्या एका महिलेने पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल  यांची मुलगी असल्याचा दावा केला होता. आता तसेच एक प्रकरण समोर आले आहे.  एका 32 वर्षीय तरुणाने बॉलिवूड अभिनेत्री आणि बच्चन घराण्याची सून ऐश्वर्या राय बच्चन आपली आई असल्याचा दावा केला आहे.  विशेष म्हणजे, या तरूणाचा जन्म झाला तो 1988 साली  आणि त्यावेळी ऐश्वर्या होती ती केवळ  15 वर्षांची.

स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, या तरुणाचे नाव संगीत कुमार आहे. त्याच्या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात त्याने ऐश्वर्या राय ही माझी आई असल्याचा दावा केला आहे. आपला जन्म हा आईव्हीएफ (इन विट्रो फर्टिलाइजेशन) द्वारे लंडनमध्ये झाला असल्याचा दावाही त्याने केला आहे.

संगीत कुमारने केलेल्या दाव्यानुसार, त्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याचे मॉम डॅड वृंदा राय आणि दिवंगत कृष्णराज राय यांनी दोन वर्षे त्याचा सांभाळ केला. यानंतर त्याचे पिता वदिवेलू रेड्डी त्याला आपल्यासोबत विशाखापट्टणम येथे घेऊन आलेत. त्याच्या नातेवाईकांनी त्यांच्या जन्मासंबंधीचे सर्व पुरावे नष्ट करून टाकले आहे.  

ऐश्वर्या रायचा मुलगा असल्याचा दावा करणा-या संगीत कुमारला आपल्या आई अर्थात ऐश्वर्या राय सोबत मुंबई राहायचे आहे.
तूर्तास या व्हायरल व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. ऐश्वर्याने मात्र अद्याप यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
अगदी अलीकडे करमाला मोडेक्स या 45 वर्षांच्या महिलेने अनुराधा पौडवाल यांची मुलगी असल्याचा दावा केला होता. कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल करत अनुराधा पौडवाल यांच्याकडे तिने 50 कोटींची नुकसानभरपाई मागितली आहे. तिरूअनंतरपुरम कोर्टाने यासंदर्भात पौडवाल यांना नोटीस बजावली असून 27 जानेवारीला कोर्टात हजर राहायला सांगितले आहे.
 

Read in English

Web Title: 32 year old man claimed that aishwarya rai bachchan to be his mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.