धकधक गर्ल माधुरी जे काही करते ते हटकेच करते. आता बिझी शे़ड्युअमधून वेळ काढत माधुरी जगातील सर्वात महगाड्या समजल्या जाणारा  अफ्रिका येथील सेशल्स आयलँड येथे पती श्रीराम नेनेसह व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. सेशल्स येथे निवांत क्षण तिने सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केले आहेत. 


फुल ऑन धमाल करताना माधुरी पाहायला मिळते आहे. माधुरीसह पती श्रीराम देखील फुल्ल ऑन चिल करताना पाहायला मिळतात. अरिन आणि रयान हे दोन्ही मुलंही यावेळी माधुरी सोबत क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहेत. सेशेल्सच्या रस्त्यांवर माधुरी मस्त फिरताना पाहायला मिळते. या दोघांचे व्हॅकेशन फोटो पाहून चाहते कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. 


17 ऑक्टोबर 1999 मध्ये दोघे लग्नबंधनात अडकले होते.लग्नानंतर माधुरी पतीसह अमेरिकेत स्थायिक झाली होती.  त्यावेळी ती बॉलिवूडपासून लांब जात जवळपास दहा वर्ष माधुरी संसारात रमली होती. 2007 मध्ये तिने आजा नचले सिनेमातून बॉलिवूडमध्ये धमाकेदार कमबॅक केले होते. 

त्यानंतर छोट्या पडद्यावरही ती झळकली. डान्स दिवाने 2 मध्ये ती जजच्या भूमिकेत दिसली. त्यानंतर कलंक सिनेमातही ती झळकली. या सिनेमामुळे जवळपास दोन दशकानंतर माधुरी आणि संजय दत्त ही जोडी रसिकांना पाहायला मिळाली.

माधुरीने १५ ऑगस्ट या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहायला मिळाला होता. आता या चित्रपटानंतर पंचक हा तिचा दुसरा चित्रपट असून तिचे पती डॉ. श्रीराम नेने देखील या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाची कथा कोकणातील एका गावाभोवती फिरणारी असून या चित्रपटात अंधश्रद्धा, मृत्यूविषयी असणारी भीती याविषयी दाखवण्यात येणार आहे.

 

या चित्रपटाविषयी माधुरी सांगते, ‘या चित्रपटाची कथा एका कुटुंबावर आधारित असून अंधश्रद्धेमुळे कशा गमतीजमती घडतात हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट एक फॅमिली चित्रपट असून प्रेक्षकांना संपूर्ण कुटुंबासोबत पाहाता येणार आहे.

Web Title: 20 years of togetherness! Madhuri Dixit Nene celebrates her wedding Anniversary with husband Dr. Shriram Nene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.