प्रभासचे फॅन्स साहो सिनेमाच्या रिलीजची वाट मोठ्या आतुरतेने करतायेत. 30 ऑगस्टला साहो प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. या सिनेमात बॉलिवूडची हॉट अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिस डान्सिंग नंबरवर थिरकताना दिसणार आहेत. प्रभास आणि जॅकलिनवर हे गाणं चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याला नीति मोहन आणि बादशाहने गायले आहे. 


आजतकच्या रिपोर्टनुसार एका गाण्यासाठी जॅकने 2 कोटी रुपये आकारले आहे. प्रभास आणि जॅकलिनची सिजलिंग केमिस्ट्री फॅन्सना पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत साहोची तीन गाणी रिलीज झाली आहेत. तिनही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. 


साहोकडे 2019 मधला सर्वात बिग बजेट सिनेमा म्हणून पाहिलं जातंय.  या सिनेमात काम करण्यासाठी  प्रभास आणि श्रद्धा कपूरने भलीमोठी रक्कम आकारली आहे.  रिपोर्टनुसार प्रभासने 100 कोटींचे मानधन घेतल्याची माहिती आहे. या मानधनासोबत प्रभास फिल्म इंडस्ट्रीमधील सगळ्यात महागडा स्टार बनला आहे. प्रभासचे यात दमदार अॅक्शन सीन्स बघायला मिळणार आहेत. एक अॅक्शन शूट करण्यासाठी जवळपास 70 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. प्रभास त्याच्या या सिनेमासाठी चांगलीच मेहनत घेतली आहे.

सिनेमाचे दिग्दर्शक सुजीत ही प्रत्येक अ‍ॅक्शन सीनकडे बारकाईने लक्ष दिले आहे. प्रत्येक सीनमध्ये प्रभास अतिशय प्रभावशाली दिसला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत आहेत.साहो हा सिनेमा भारतातील पहिला बहुभाषी चित्रपट असून एकाच वेळी हिंदी, तेलगू आणि तमिळ या भाषांमध्ये हा शूट केला गेला आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 2 crore amount jacqueline fernandez paid for saaho song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.