17 crore missing from Sushant Singh; Dinesh Vijayan on ED's radar | सुशांतसिंहचे १७ कोटी गहाळ; दिनेश विजयन ईडीच्या रडारवर

सुशांतसिंहचे १७ कोटी गहाळ; दिनेश विजयन ईडीच्या रडारवर

ठळक मुद्देसुशांतला १७ कोटींचे पेमेंट  कोठे व कसे केले? याबाबत ईडीने निर्माता दिनेश विजयन यांच्याकडे सविस्तर माहिती मागितली होती. मात्र त्यांनी दिलेल्या कागदपत्रांतून काहीही स्पष्टता झालेली  नसल्याचे अधिकाऱ्यांनी  सांगितले

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याला ‘राब्ता’ या चित्रपटासाठी मिळालेल्या १७ कोटींचा हिशोब लागलेला नाही. सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) त्याबाबत सर्व आर्थिक व्यवहार तपासूनही ही रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा झाल्याचे  दिसत नाही.

सुशांतला १७ कोटींचे पेमेंट  कोठे व कसे केले? याबाबत ईडीने निर्माता दिनेश विजयन यांच्याकडे सविस्तर माहिती मागितली होती. मात्र त्यांनी दिलेल्या कागदपत्रांतून काहीही स्पष्टता झालेली  नसल्याचे अधिकाऱ्यांनी  सांगितले. त्यामुळे त्यांची पुन्हा चौकशी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. सध्या विजयन हे कामानिमित्त दुबईत आहेत. काेराेना झाल्यामुळे उपचार सुरू असल्याने त्यांनी ईडीला चौकशीसाठी हजर राहण्यास असमर्थता दर्शविली होती. १४ जूनला वांद्रे येथील राहत्या घरी सुशांतने गळफास लावून आत्महत्या केली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 17 crore missing from Sushant Singh; Dinesh Vijayan on ED's radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.