विदर्भात काँग्रेसचे नेते आहेत तरी कुठे? एकमेकांचे तोंडही पाहात नाहीत ! भंडाऱ्यातील सभेत बावनकुळे यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 18:14 IST2025-11-25T18:13:53+5:302025-11-25T18:14:48+5:30
Bhandara : नगरपालिका निमित्ताने भाजपा नेते चंद्रशेखर निवडणुकीच्या बावनकुळे यांच्या पवनी, साकोली, तुमसर आणि भंडारा येथे सभा झाल्या.

Where are the Congress leaders in Vidarbha? They don't even look at each other! Bawankule's criticism in the meeting in Bhandara
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : काँग्रेसचे नेते आहेत तरी कुठे, त्यांचे खासदार करतात तरी काय, असा प्रश्न विचारत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, काँग्रेसचे नेते एकमेकांचे तोंडही पाहात नाहीत, अशी टीका केली.
नगरपालिका निमित्ताने भाजपा नेते चंद्रशेखर निवडणुकीच्या बावनकुळे यांच्या पवनी, साकोली, तुमसर आणि भंडारा येथे सभा झाल्या. भंडारा येथे किसान चौकात झालेल्या सभेत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, भंडाऱ्याचे भाजपाचे खासदार आहेत कुठे, हे दिसत नाही. पक्षातील नेत्यांचे एकमेकांसोबत पटत नाही.
विजय वडेट्टीवर, नाना पटोले यांचे तोंड पाहात नाही. ते प्रदेशाध्यक्षांचे तोंड पाहत नाहीत. हा पक्ष कमजोर झाल्याने त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे कार्यकर्ते पक्ष सोडत आहेत.
एक है तो सेफ है
एकत्र राहा, असा सल्ला देऊन बावनकुळे उपस्थिताना म्हणाले, एक है तो सेफ है. तुकड्यांमध्ये विभागू नका. तुमसरमधील सभेतही आमदार परिणय फुके यांनी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे' या विधानाचा पुनरूच्चार केला. आपल्या वक्तव्याचा अर्थ स्पष्ट करीत, मतांचे विभाजन होऊ देऊ नका, असेही नंतर आवाहन केले. नेत्यांच्या या विधानाची उपस्थितांमध्ये एकच चर्चा होती. स्थानिक पातळीवर राजकारण तापलेले दिसत आहेत.