निवृत्तीला आलेल्या शिक्षकाचे विद्यार्थिनीशी चाळे, झाली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 16:36 IST2023-08-07T16:33:43+5:302023-08-07T16:36:15+5:30

मुलीने घरी जाऊन आजीला शाळेत घडलेली घटना सांगितली.

teacher arrested for molesting a student | निवृत्तीला आलेल्या शिक्षकाचे विद्यार्थिनीशी चाळे, झाली अटक

निवृत्तीला आलेल्या शिक्षकाचे विद्यार्थिनीशी चाळे, झाली अटक

साकोली (भंडारा) : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने नऊ वर्षीय मुलीशी अश्लील चाळे केले. यात मुलीच्या आजीने केलेल्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी पाेक्साेअंतर्गत शिक्षकाला अटक केली आहे.

देवराम लक्ष्मण पटले (५६) असे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. शाळेत खेळ शिकवत असताना मुलीच्या नको असणाऱ्या शरीराच्या भागाला स्पर्श केल्याने मुलगी ओरडली. मुलीने घरी जाऊन आजीला शाळेत घडलेली घटना सांगितली. एक महिन्यापूर्वी याच शिक्षकाने मुलीशी ऑफिसमध्ये कार्यालयात एकटीलाच बोलवून अत्यंत घाणेरड्यारितीने अश्लील चाळे केले होते. पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने मुलीच्या आजीने साकोली पोलिस ठाण्यात ५ ऑगस्टला घटनेची तक्रार दिली. शिक्षक देवराम लक्ष्मण पटले या शिक्षकावर कलम ३७६ (२)जे, एफ सहकलम ४,६,८,१० व पाेक्साेअंतर्गत कारवाई करण्यात आली. तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय खोकले करीत आहेत. ही शाळा एक शिक्षकी असून पहिली ते चौथीपर्यंत केवळ बाराच विद्यार्थी आहेत.

Web Title: teacher arrested for molesting a student