Maharashtra Election 2019 ; नेते फॉर्मात, कार्यकर्ते सावध भूमिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 06:00 AM2019-10-13T06:00:00+5:302019-10-13T06:01:05+5:30

स्वत:चे आगळे वेगळे स्थान निर्माण करण्याकरिता राजकारणात कटू निर्णय तात्काळ घ्यावे लागतात. ते येथे होताना दिसत आहे. काल एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी आता एका बॅनरखाली दिसत आहेत. याचेच नाव राजकारण आहे. राजकारणात काहीही होऊ शकते याची प्रचिती येथे मात्र येत आहे.

Maharashtra Election 2019 ; In the leader form, the activist in a cautious role | Maharashtra Election 2019 ; नेते फॉर्मात, कार्यकर्ते सावध भूमिकेत

Maharashtra Election 2019 ; नेते फॉर्मात, कार्यकर्ते सावध भूमिकेत

Next
ठळक मुद्देकार्यकर्ते झाले हुशार : कोण कुणाचा, थांगपत्ता लागेना

मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : विधानसभा निवडणुकीला आता अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. तुमसर मतदारसंघात उमेदवार व नेते फार्मात दिसत असून कार्यकर्त्यांची भूमिका सावध दिसत आहे. काँग्रेस - राष्ट्रवादी व भाजप - सेना व अपक्षांचा सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. कोण कार्यकर्ता कुणाचा आहे याची संभ्रमावस्था आहे. एकामेकांकडे शंकेने बघितले जात आहे. आपले काय अमूक करीत आहे काय? प्रामाणिक साथ देईल काय? या चिंतेने सध्या उमेदवारांना ग्रासले आहे.
राजकारणात काहीही होऊ शकते, यात कायम कुणी मित्र व शत्रू राहत नाही. दोन भीन्न तत्व प्रणालीचे पक्ष व त्यांचे नेते पक्षाचा त्याग करून प्रवेश करीत आहेत. जे पक्षात होते ते बाहेर पडले आहेत. मात्र कार्यकर्ता येथे भरडला जात आहे. काय करावे असा विचार करीत आहे. आमचे प्रेम अमक्यावर आहे तर मी त्यांचा काम करेन, परंतु प्रेमाला राजकारणात स्थान नाही. येथे परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागतो असे बाळकडू दुसरे पाजत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
स्वत:चे आगळे वेगळे स्थान निर्माण करण्याकरिता राजकारणात कटू निर्णय तात्काळ घ्यावे लागतात. ते येथे होताना दिसत आहे. काल एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी आता एका बॅनरखाली दिसत आहेत. याचेच नाव राजकारण आहे. राजकारणात काहीही होऊ शकते याची प्रचिती येथे मात्र येत आहे.

बड्या नेत्यांचा उद्या प्रवेश
तुमसर मतदारसंघातील मोठे नेत्यांचा उद्या अधिकृत भाजपमध्ये प्रवेश होत असल्याची माहिती आहे. येथे राजकारण ढवळून निघाले आहे. पुन्हा दोन दिवसात इतरांचे प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
नेत्यांची फिल्डींग
तुमसर मतदार संघात राजकीय पक्ष नेत्यांनी मोठी फिल्डींग लावली आाहे. अटीतटीची निवडणूक होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे रिस्क नको म्हणून वरिष्ठ नेत्यांनी दुसऱ्या नेत्यांची येथे नेमणूक केली आहे. वरिष्ठ नेते येथे संध्याकाळी, रात्री दररोजची माहिती नेमणूक केलेल्या नेत्यांकडून घेत आहेत.

Web Title: Maharashtra Election 2019 ; In the leader form, the activist in a cautious role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.