Maharashtra Election 2019 : तीनही मतदार संघात तिरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 05:00 AM2019-10-08T05:00:00+5:302019-10-08T05:00:28+5:30

नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या शेवटच्या दिवशी २७ जणांनी उमेदवारी मागे घेतल्याने आता ३९ उमेदवार रिंगणात आहेत. तुमसर मध्ये भाजप बंडखोर आमदार चरण वाघमारे, भंडारात शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. तर साकोलीत काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये वंचित बहूजन आघाडीकडून निवडणूक लढवित आहे.

Maharashtra Election 2019 : All three constituencies fought triangularly | Maharashtra Election 2019 : तीनही मतदार संघात तिरंगी लढत

Maharashtra Election 2019 : तीनही मतदार संघात तिरंगी लढत

Next
ठळक मुद्दे२७ उमेदवारांची माघार : तुमसरमध्ये १०, भंडारात १४ आणि साकोलीत १५ उमेदवार रिंगणात

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात बंडखोरानी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने तुमसर, भंडारा आणि साकोली मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या शेवटच्या दिवशी २७ जणांनी उमेदवारी मागे घेतल्याने आता ३९ उमेदवार रिंगणात आहेत. तुमसर मध्ये भाजप बंडखोर आमदार चरण वाघमारे, भंडारात शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. तर साकोलीत काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये वंचित बहूजन आघाडीकडून निवडणूक लढवित आहे.
भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभेसाठी ७० उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी चार उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद ठरले. ६६ उमेदवार कायम होते. यापैकी कोण आपली उमेदवारी मागे घेणार याची संपूर्ण जिल्ह्याला उत्सूकता लागली होती. नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी तब्बल २७ उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतली. तुमसर विधानसभा मतदारसंघात पाच उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता तेथे १० उमेदवार रिंगणात आहेत. भंडारा मतदार संघात ११ जणांनी माघार घेतल्याने येथे १४ उमेदवार तर साकोली मतदारसंघात ११ जणांनी मागार घेतल्याने १५ उमेदवार रिंगणात आहेत.
नामांकन मागे घेतल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. तुमसरमध्ये युतीत बंडखोरी झाली आहे. तिकीट नाकारल्याने आमदार चरण वाघमारे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून उमेदवारी मागे घेण्यासाठी त्यांची मनधरणी करण्यात आली. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत ते आपल्या भूमिकेवर कायम राहिले. तर राष्टÑवादीचे बंडखोर माजी आमदार अनिल बावनकर आणि योगेश सिंगनजुडे यांनी माघार घेतली. तुमसर मतदारसंघात तिरंगी लढत होणार हे आता निश्चित झाले आहे.
तिकीट नाकारल्याने भंडाराचे भाजप आमदार रामचंद्र अवसरे यांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र सोमवारी त्यांनी आपले नामांकन मागे घेतले. तर भंडारा मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. या जागेवर शिवसेनेने सुरुवातीपासून दावा केला होता. मात्र ही जागा युतीच्या मित्र पक्षाला गेली. त्यामुळे भोंडेकर यांनी अपक्ष निवडणूक रिंगणात उडी घेतली. साकोली मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांना पक्षाने तिकीट नाकारले. त्यामुळे त्यांनी अगदी वेळेवर वंचित बहूजन आघाडीत प्रवेश करुन आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे येथेही तिरंगी लढतीची शक्यता आहे.

भंडारात ११ जणांची माघार
भंडारा विधानसभा क्षेत्रातून सोमवारी ११ जणांनी माघार घेतली. त्यात मनसेच्या पूजा गणेश ठवकर, भाकपचे हिवराज उके यांच्यासह अपक्ष अनुसयाबाई बावणे, रामचंद्र अवसरे, गोवर्धन चौबे, चेतक डोंगरे, अ‍ॅड. नितीन बोरकर, नितीन बागडे, विकास राऊत, मुकेश लोखंडे, सुधीर नामदेव रामटेके यांचा समावेश आहे.

साकोलीत ११ जणांची माघार
साकोली विधानसभा मतदारसंघातून ११ उमेदवारांनी माघार घेतली आहे. माघार घेणाऱ्यांमध्ये अपक्ष अण्णा फटे, अनिल मेश्राम, अशोक पटले, चंद्रशेखर टेंभुर्णे, दिनेश वासनीक, धीरज गोस्वामी, प्रकाश देशकर, डॉ. ब्रम्हानंद करंजेकर, भागवत मस्के, राकेश चोपकर, संजय केवट यांचा समावेश आहे.

तुमसरमध्ये पाच जणांची माघार
तुमसर विधानसभा मतदारसंघातून पाच जणांनी माघार घेतली. त्यात माजी आमदार अनिल बावनकर, गौरीशंकर मोटघरे, योगेश सिंगनजुडे, राजकुमार मनिराम माटे, सुरेश हरिश्चंद्र रहांगडाले यांचा समावेश आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 : All three constituencies fought triangularly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.