मागच्या निवडणुकीत नेत्यांमुळे पराभव, आता जनतासोबत असल्याने विजय निश्चित: बजरंग सोनवणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 19:14 IST2024-04-05T11:48:35+5:302024-04-08T19:14:10+5:30
जनताच निवडणूक हाती घेऊन मला निवडून देणार, यात कसलीही शंका नाही.

मागच्या निवडणुकीत नेत्यांमुळे पराभव, आता जनतासोबत असल्याने विजय निश्चित: बजरंग सोनवणे
- नितीन कांबळे
कडा- मागील निवडणुकीत सर्व नेते माझ्याबरोबर होते म्हणून माझा पराभव झाला, पण आता जनता बरोबर असल्याने माझा विजय निश्चित असल्याचा दावा बीड लोकसभेचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केला. त्यांनी आज सकाळी आष्टी तालुक्यातील कडा येथे पत्रकारांशी संवाद साधला.
बीड लोकसभेसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बजरंग सोनवणे आज सकाळी प्रथमच जिल्ह्यात दाखल झाले. त्यांनी आष्टी तालुक्यातील कडा येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, जिल्ह्यातील जनतेचा सन्मान आणि स्वाभिमान राखण्यासाठी मी निवडणूक लढत आहे. जनताच निवडणूक हाती घेऊन मला निवडून देणार, यात कसलीही शंका नाही. सर्वसामान्य जनता माझ्याबरोबर असल्याने आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर, महेबूब शेख, राम खाडे, किशोर हंबर्डे, सुनिल नाथ, दिपक खिळे यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.