Maharashtra Election 2019: बीडमध्ये १९८० ची पुनरावृत्ती नक्की होणार; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 10:50 AM2019-10-17T10:50:28+5:302019-10-17T10:51:16+5:30

बीड विधानसभा निवडणूक २०१९ - बीडला सध्या एक वेगळेच वातावरण आहे. आपण ज्यांना साथ दिली, त्यांनी भलत्याच घरी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला

Maharashtra Election 2019: There will be a repeat of 1980 in the beed; Sharad Pawar expressed his faith | Maharashtra Election 2019: बीडमध्ये १९८० ची पुनरावृत्ती नक्की होणार; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास 

Maharashtra Election 2019: बीडमध्ये १९८० ची पुनरावृत्ती नक्की होणार; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास 

Next

बीड - १९८० साली मी बीड जिल्ह्यात निवडणुकीसाठी जे उमेदवार दिले ते सगळे निवडून आले, त्याची पुनरावृत्ती यावेळी नक्की होणार. आज नवी पिढी उभारण्याची भूमिका आपण घेतली आहे. या भूमिकेला मोठा पाठिंबा बीड जिल्ह्यातून मिळतोय. परिवर्तनाच्या या लढ्यात बीडची जनता पुढाकार घेईल असा विश्वास बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. बीड मतदारसंघातील संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी ते बोलत होते. 

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, बीडला सध्या एक वेगळेच वातावरण आहे. आपण ज्यांना साथ दिली, त्यांनी भलत्याच घरी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. असा निर्णय घेणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा निर्णय बीडकरांनी घेतला आहे असं त्यांनी सांगितले. 
तसेच मी गुदमरलो होतो म्हणून त्या घरी गेलो असे सांगत इथल्या नेतृत्वाने नवा घरोबा केला. ज्यांना तीन वेळा मंत्री केलं, सत्तेची ऊब आणि शक्ती दिली ते असं वागले. मात्र, असं सारखं कुंकू बदलायचं नसतं. घरोबा एकदाच करायचा असतो आणि तिथे प्रामाणिकपणाने राहायचं असतं. दुसऱ्या घरोब्याचा शोध केला तर लोक त्याबद्दल काय बोलतात हे न बोललेलंच बरं असा टोला शरद पवारांनी जयदत्त क्षीरसागर यांना लगावला आहे. 

यापूर्वी अहमदनगर येथे झालेल्या सभेतही बबनराव सातपुतेंवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना त्यांचे एक भाषण वाचनात आले होते. त्यांनी सभागृहासमोर काही कागदपत्रे ठेऊन हे माजी मंत्री दरोडेखोर असल्याचा आरोप केला होता आणि आज आरोप करणारे मुख्यमंत्री झालेत आणि त्यांचं कौतुक करत आहेत.. मुख्यमंत्री साहेब, अहो असं वागणं बरं नव्हं असा चिमटा पवारांनी काढला. 

तर राज्यात तेरा वर्षे जर मंत्रीपद देऊन देखील यांना काही काम करता येत नसेल तर हातात बांगड्या भरल्या पाहिजेत. याला आपल्या इथे म्हणतात, नाचता येईना अंगण वाकडे अशा शब्दात शरद पवारांनी बबनराव पाचपुतेंचा समाचार घेतला.  
 

Web Title: Maharashtra Election 2019: There will be a repeat of 1980 in the beed; Sharad Pawar expressed his faith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.