Daily Top 2Weekly Top 5

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ जानेवारी २०२६ : आपल्या कामाचे योग्य कौतुक होईल, मान-सन्मान वाढेल!

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2026-01-23 07:30:512026-01-23 07:32:02 | Updated: 2026-01-23 07:32:02

Today Daily Horoscope 23 january 2026: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष: आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल. सामाजिक स्तरावर यश व कीर्ती वाढेल. व्यापारात लाभ होईल. विवाहाची बोलणी करण्याच्या दृष्टीने विवाहेच्छुकांना यश मिळेल. दुपार नंतर मात्र प्रकृती बिघडू शकते.  आणखी वाचा 

वृषभ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यावसायिक स्थिती आपणास अनुकूल राहील. आपल्या कामाचे योग्य कौतुक होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. कामे सहजपणे पूर्ण होऊ शकल्याने काही लाभ पदरी पडेल. आणखी वाचा 

मिथुन:  आज प्रतिस्पर्धी व वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता आहे. मनोरंजनात्मक वस्तू खरेदी करण्यासाठी अधिक पैसा खर्च होईल. व्यवसायात वातावरण चांगले राहील. मानसिक स्वास्थ्य सुद्धा चांगले असेल. आणखी वाचा 

कर्क: आज अवैध व निषेधार्ह विचारां पासून दूर राहणे हितावह होईल. वाणीवर संयम ठेवा. कुटुंबात भांडण झाल्याने शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. दुपार नंतर परदेशातून एखादी चांगली बातमी येईल.  आणखी वाचा 

सिंह: आरोग्याच्या दृष्टीने आज आपण प्रसन्न व आनंदित राहाल. मित्र व संबंधितांसह हिंडण्या- फिरण्याचा बेत आखून आनंददायी सहल सुद्धा करू शकाल. सामाजिक सन्मान होतील. भागीदारांसह सकारात्मक चर्चा होईल. आणखी वाचा 

कन्या: आज स्वभावात जरा जास्त संवेदनशीलता राहील. कार्य सफल झाल्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित राहतील. यश व कीर्ती वाढेल. स्त्रियांना माहेरहून चांगल्या बातम्या मिळतील. शारीरिक व मानसिक दृष्टया प्रसन्नता जाणवेल. आणखी वाचा 

तूळ: लेखनकार्य करण्यास आजचा दिवस शुभ आहे. बौद्धिक चर्चेतून लाभ संभवतात. कीर्ती वाढेल. आज जास्त भावनावश व्हाल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आणखी वाचा 

वृश्चिक: आज हट्ट सोडणे हितावह राहील. आज आपण भावनेच्या आहारी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसिक ताण वाढेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. वैभवी वस्त्र, दागीने व सौंदर्य प्रसाधने यांवर खर्च होईल.  आणखी वाचा 

धनु: आज मन उत्साहित राहील. कुटुंबीयांसह कौटुंबिक प्रश्नांवर चर्चा होईल त्यातून योग्य निर्णय घेऊ शकाल. मित्रांशी संबंध वाढतील व प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नशिबाची साथ मिळेल. दुपार नंतर मात्र आपण अधिक संवेदनशील व्हाल.  आणखी वाचा 

मकर: आज एखाद्या मंगल कार्यासाठी आपणास खर्च करावा लागेल. वाद - विवादामुळे कौटुंबिक वातावरण गढुळ होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांचे मन दुखावेल व ते आपल्यावर नाराज होतील. दुपार नंतर मनातील चिंता दूर होतील.  आणखी वाचा 

कुंभ:  आज प्रापंचिक गोष्टीं ऐवजी गूढ विषयांकडे आपला जास्त कल होईल. नकारात्मक विचार काढून मानसिक स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करा. शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता दिवसभर राहील.  आणखी वाचा 

मीन: आज आर्थिक देवाण- घेवाण, वसुली, थकबाकी इत्यादी कार्यात व गुंतवणूक करताना सावध राहावे लागेल. इतरांच्या कामांत व्यत्यय आणू नका. कोर्ट- कचेरी प्रकरणात सावध राहावे लागेल. वाणी व संतापावर नियंत्रण ठेवावे लागेल.  आणखी वाचा 

English
हिंदी सारांश
Web Title : Today's Horoscope, January 23, 2026: Recognition and respect are coming!

Web Summary : Aries sees financial gains, Taurus gets recognition. Gemini may face conflicts. Cancer should avoid negative thoughts. Leo enjoys social events. Virgo receives good news. Libra benefits from intellectual discussions. Scorpio should control emotions. Sagittarius will solve family matters. Capricorn may have family disputes. Aquarius focuses on spiritual matters. Pisces needs to be cautious in financial dealings.
Web Title : आज का राशिफल, 23 जनवरी 2026: आपके काम की सराहना होगी, मान-सम्मान बढ़ेगा!

Web Summary : मेष राशि को आर्थिक लाभ, वृषभ को पहचान मिलेगी। मिथुन राशि वालों को विवादों का सामना करना पड़ सकता है। कर्क राशि वाले नकारात्मक विचारों से बचें। सिंह सामाजिक आयोजनों का आनंद लेंगे। कन्या राशि को शुभ समाचार मिलेगा। तुला राशि को बौद्धिक चर्चाओं से लाभ होगा। वृश्चिक राशि वाले भावनाओं को नियंत्रित करें। धनु राशि पारिवारिक मामलों को सुलझाएंगे। मकर राशि में पारिवारिक विवाद हो सकते हैं। कुंभ राशि का ध्यान आध्यात्मिक मामलों पर रहेगा। मीन राशि को वित्तीय लेन-देन में सावधानी बरतने की आवश्यकता है।
टॅग्स :दैनिक राशीभविष्यराशी भविष्य
Open in App