मेष - आज चंद्र ०९ ऑक्टोबर, २०२५ गुरूवार च्या दिवशी मेष राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आनंदोस्तव साजरा करण्याचा आहे. आजचा दिवस शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगला जाईल. प्रत्येक काम यशस्वी होईल. आणखी वाचा
वृषभ - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आपणास विविध चिंता सतावतील. प्रकृतीची साथ मिळणार नाही. स्नेही व नातलग ह्यांच्याशी मतभेद झाल्याने घरात विरोधी वातावरण निर्माण होईल. कामे अपूर्ण राहतील. काही कारणास्तव खर्च वाढेल. आणखी वाचा
मिथुन- आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज कुटुंबात खुशीचे, आनंदाचे वातावरण राहील. नोकरी - व्यवसायात लाभाच्या बातम्या मिळतील. उच्च पदाधिकारी आपल्या कामाची प्रशंसा करतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. आणखी वाचा
कर्क - आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज नोकरीत वरिष्ठांच्या प्रोत्साहनाने आपला उत्साह द्विगुणित होईल. पगारवाढ किंवा पदोन्नती झाल्यास आश्चर्य वाटायला नको. आई तसेच इतर कुटुंबीय ह्यांच्याशी सौहार्दाचे संबंध राहतील. आणखी वाचा
सिंह - आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज मंगल कार्यात आपल्या स्नेहीजनांसह सहभागी व्हाल. कर्तव्यनिष्ठ राहून हाती घेतलेले काम तडीस नेण्याचा प्रयत्न कराल. सर्व व्यवहार न्यायानुसार असेल. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा
कन्या - आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज 'मनावर संयम ठेवावा लागेल. स्वभावांतील उग्रतेमुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. हितशत्रू विघ्न उपस्थित करतील. नवीन कार्यारंभ लांबणीवर टाका. जलाशया पासून दूर राहा. आणखी वाचा
तूळ - आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपले मन मित्रांसह खाणे - पिणे, फिरावयास जाणे तसेच प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आनंदी राहील. एखादी सहल संभवते. मनोरंजनाची साधने व वस्त्रालंकार यांची खरेदी होईल. आणखी वाचा
वृश्चिक - आजचा दिवस सौख्यदायी आहे. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवू शकाल. शारीरिक स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता अनुभवाल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. स्त्रीयांना माहेरहून एखादी चांगली बातमी मिळेल. आणखी वाचा
धनु - आज शक्यतो प्रवासाचा बेत स्थगित ठेवावा. कार्यातील अपयश मनात नैराश्य निर्माण करील व त्यामुळे संताप वाढेल. पण हा राग नियंत्रणात ठेवल्यास गोष्टी जास्त चिघळणार नाहीत. पोटाच्या तक्रारीने हैराण व्हाल. वाद - विवाद किंवा चर्चा यामुळे समस्या निर्माण होईल. आणखी वाचा
मकर - आज आपणास प्रतिकूलतेस तोंड द्यावे लागेल. घरगुती क्लेश मनाला यातना देतील. आईची प्रकृती मनात चिंता उत्पन्न करेल. सार्वजनिक जीवनात अपयश, अपकीर्ती होईल किंवा मान - प्रतिष्ठेची हानी होईल. पुरेशी विश्रांती व झोप न मिळाल्याने आरोग्य बिघडेल. आणखी वाचा
कुंभ - आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपणास मोकळेपणा जाणवेल. शारीरिक स्वास्थ्य आपला उत्साह वाढवेल. शेजारी व भावंडांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होतील. आणखी वाचा
मीन - आज खर्च, संताप व जीभ यावर संयम ठेवावा लागेल. कोणाशी भांडण होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार व पैश्यांच्या देवाण - घेवाणीत सावध राहावे. कुटुंबियांशी भांडण होईल. नकारात्मक विचार मनावर छाप पाडतील. आणखी वाचा
Web Summary : October 9, 2025, brings varied fortunes. Aries celebrates success; Taurus faces challenges. Gemini anticipates gains, while Cancer enjoys recognition. Libra finds joy with friends; Scorpio experiences familial bliss. Exercise caution in travel and finances.
Web Summary : 9 अक्टूबर, 2025 को विभिन्न राशियों के लिए अलग-अलग भविष्यवाणियां हैं। मेष राशि के जातक सफलता का जश्न मनाएंगे, वृषभ को चुनौतियों का सामना करना पड़ेगा। मिथुन को लाभ होगा, कर्क को पहचान मिलेगी। यात्रा और वित्त में सावधानी बरतें।