आजचे राशीभविष्य, १ ऑक्टोबर २०२२; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता, आर्थिक लाभ सुद्धा होतील

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-10-01 07:17:15 | Updated: October 1, 2022 07:17 IST

Today's Horoscope 1 October 2022, Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष - आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज आपणास एक वेगळाच अनुभव येईल. एखादी गूढ विद्या व त्यांसंबंधीत गोष्टींचे आकर्षण वाटेल. आज एखाद्या विषयात आपण प्रावीण्य मिळवू शकाल. वाणी व द्वेष भावना ह्यांवर आवर घालावा लागेल. आणखी वाचा 

वृषभ - आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज दांपत्य जीवनात विशेष आनंद मिळेल. आपण सहकुटुंब एखाद्या सामाजिक ठिकाणी फिरायला किंवा छोटा प्रवास करायला जाऊन दिवस आनंदात घालवाल. स्नेह्यांसह उत्तम भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. विदेशातील मित्रां कडून आनंददायी बातम्या मिळतील. अचानक धनलाभ होईल. व्यापार्‍यांना व्यापारात वृद्धी होईल. आणखी वाचा 

मिथुन - आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आज आपली अपूर्ण कामे पूर्ण होतील. त्यात मनासारखे यश मिळेल. घरातील शांती व समाधानाचे वातावरण मनाला प्रसन्न ठेवेल. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक लाभ होईल.  आणखी वाचा 

कर्क - आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. पोटदुखीचा विकार बळावेल. मानसिक चिंता व उद्वेग राहील. अचानक खर्च वाढतील. वाद संभवतात. आणखी वाचा 

सिंह - आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य नादुरुस्त असेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. आपल्या वक्तव्याने गैरसमज वाढतील व आपले मन उदास होईल. आईशी मतभेद होतील व तीच्या प्रकृतीची काळजी वाटत राहील. आणखी वाचा 

कन्या - आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज प्रत्येक कामात विचारपूर्वक पाऊल टाकावे लागेल. भावंडांशी सौहार्दाचे संबंध टिकून राहतील. मित्र व स्वकीयांशी सुसंवाद साधू शकाल. प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ सुद्धा होतील.  आणखी वाचा

तूळ - आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज आपले मनोबल कमी राहिल्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे अवघड होईल. नवीन काम किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय आज टाळणे हितावह राहील. वाणीवर संयम ठेवल्यास कुटुंबियांशी होणारे संभाव्य वाद टाळू शकाल. आणखी वाचा 

वृश्चिक -  आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह दिवस आनंदात घालवू शकाल. स्वकीयांकडून भेटवस्तू प्राप्त होतील. आणखी वाचा 

धनु - आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आजचा दिवस कष्टदायी आहे. कुटुंबियांशी मतभेद होतील. स्वभावात क्रोध व आवेश राहिल्याने कोणाशी तीव्र स्वरुपाचे भांडण होईल. आरोग्य बिघडेल. बोलणे व वागणे यांवर संयम ठेवावा लागेल. एखादी दुर्घटना संभवते. पैसा जास्त प्रमाणात खर्च होईल. आणखी वाचा 

मकर - आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस लाभदायी असून आपण एखाद्या शुभ प्रसंगाचा बेत आखाल. एखाद्या वस्तूची खरेदी करण्यास दिवस अनुकूल आहे. शेअर - सट्टा ह्यात धन लाभ होईल. मित्र व संबंधित ह्यांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. आणखी वाचा  

कुंभ -  आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आज आपण वरिष्ठ अधिकारी व वयोवृद्धांची मर्जी संपादन करू शकाल. आपली सर्व कामे अगदी सहजपणे पूर्ण होत असल्याचा अनुभव येईल. नोकरी - व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. मानसिक शांतता लाभेल. प्रकृती उत्तम राहील. मान - सन्मान होतील. आणखी वाचा 

मीन - आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज शरीर व मन बेचैन राहील. संतती विषयक समस्या काळजी निर्माण करेल. नोकरीत वरिष्ठांशी वाद होऊन त्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. प्रतिस्पर्धी खंबीर बनतील. नकारात्मक विचार मनाला घेरून टाकतील.  आणखी वाचा

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App