Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २८ फेब्रुवारी २०२३, नोकरदारांना लाभदायक दिवस, आर्थिक लाभ होईल

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-02-28 07:17:40 | Updated: February 28, 2023 07:17 IST

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष - आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज आपणास आर्थिक व्यवहार सावधपणे करावे लागतील. वाद - विवादा पासून दूर राहिल्यास कुटुंबियांशी निर्माण होणारी कटुता टाळू शकाल. खाण्या - पिण्याची काळजी घ्या नाहीतर स्वास्थ्य बिघडवू शकते. भोजन वेळेवर घेता येणार नाही. आणखी वाचा

वृषभ -  आजचा दिवस फायद्याने भरलेला आहे. आज आपण शरीर व मनाने स्वस्थ राहाल. तसेच पूर्ण वेळ ताजेतवाने राहाल. आपल्यात असलेली कलात्मकता व सृजनात्मकता यांचा उपयोग कराल. आर्थिक योजना बनवाल. धनलाभ सुद्धा होऊ शकतो. आणखी वाचा

मिथुन - आज आपणास आपल्या बोलण्यावर व व्यवहारात सावध राहावे लागेल. आपल्या वक्तव्याने काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. आपले स्वास्थ्य खराब असू शकेल. विशेषतः डोळ्यांचा त्रास संभवतो. त्याकडे लक्ष द्यावे लागेल. आजचा दिवस खर्चाचा आहे. आणखी वाचा

कर्क - आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी - व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. धनलाभाची शक्यता आहे. मित्रांकडून विशेषतः स्त्रीवर्गाकडून फायदा होईल. मित्रांसह प्रवासाला जाऊ शकाल. प्रिय व्यक्तीसह वेळ चांगला जाईल. आणखी वाचा 

सिंह - आज आपणास प्रत्येक कामात उशीरा यश मिळेल. कार्यालयात किंवा घरात जबाबदार्‍यांचे ओझे वाढेल. जीवनात अधिक गंभीरतेचा अनुभव होईल. नवीन संबंध स्थापित करणे किंवा कामासंबंधी महत्वाचा निर्णय घेणे हे टाळा. पित्याशी मतभेद होतील. आणखी वाचा

कन्या - आज शरीरात थकवा, आळस व चिंता अनुभवास येतील. संतती बरोबर मतभेद होतील. त्यांच्या स्वास्थ्याची चिंता सतावेल. नोकरीत वरिष्ठांशी आपला वाद होईल. राजनैतिक संकटांचा सामना करावा लागेल. आणखी वाचा

तूळ -  आज प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. टाकून बोलणे किंवा खराब व्यवहार ह्या मुळे वाद व भांडणे होतील. क्रोध, व कामवृत्ती ह्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. हितशत्रू सरसावतील. अचानक धनलाभ होईल. वेळेवर जेवण न मिळणे किंवा होणारा अधिक खर्च आपल्या मनाला अस्वस्थ करतील. आणखी वाचा

वृश्चिक - आज आपणास नोकरी, व्यापार किंवा व्यवसाय ह्यातून भरपूर लाभ होणार आहे. तसेच मित्र, थोर मंडळी, सगेसोयरे यांच्या कडून ही लाभ होईल. सामाजिक समारोह, पर्यटन यासारख्या ठिकाणी जाऊ शकाल. आपण आनंदी राहाल. संपत्ती वाढेल. आणखी वाचा

धनु - आजचा दिवस नोकरदारांना लाभदायक आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे . घरात आनंदाचे वातावरण राहील. नोकर व सहकारी आपणाला मदत करतील. कार्यात सफलता व यश मिळेल. विरोधक व प्रतिस्पर्धी ह्यांच्यावर मात करू शकाल. आणखी वाचा

मकर - आज कला व साहित्य क्षेत्रात असणार्‍या व्यक्ती त्या क्षेत्रात विशेष कामगीरी करतील. आपल्या रचनात्मक व सृजनशील शक्तींचा इतरांना परिचय द्याल. प्रेमिकांना परस्परांत गाढ प्रेमाचा अनुभव येईल. त्यांच्या भेटी रोमांचक ठरतील. शेअर - सट्टा यात लाभ होईल. आणखी वाचा

कुंभ - आज स्वभाव जास्त हळवा बनल्याने मानसिक अस्वास्थ्य राहील. आर्थिक बाबींचे नियोजन कराल. आईकडून अधिक प्रेमाचा वर्षाव झाल्याचा अनुभव येईल. स्त्रिया सौंदर्य - प्रसाधने, वस्त्र, अलंकार यांवर जास्त खर्च करतील. विद्यार्थ्यांना यश लाभेल. आणखी वाचा

मीन - आजचा दिवस कार्यात यश मिळण्यास व महत्वपूर्ण निर्णय घेण्यास उत्तम आहे. आज विचारांत स्थैर्य असेल. त्यामुळे कोणतेही कार्य व्यवस्थीत करू शकाल. कलाकारांना कला प्रदर्शन करण्याची उत्तम संधी मिळेल. वैवाहिक जोडीदाराशी जवळीक वाढेल. आणखी वाचा

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App