मेष: आज आपल्यात तरतरीतपणा व उत्साह यांचा अभाव राहील. तसेच रागाचे प्रमाण वाढल्याने काम बिघडण्याची शक्यता आहे. तेव्हा रागावर नियंत्रण ठेवा. कार्यालयात अधिकारी, विरोधक व घरात कुटुंबीय यांच्याशी वादात न पडता शांत राहून दिवस घालवणे अधिक चांगले. आणखी वाचा
वृषभ - आज कार्यपूर्तीस होणारा विलंब व शारीरिक अस्वास्थ्य ह्यामुळे मनात नैराश्याची भावना बळावेल. कामाचा व्याप वाढल्याने मानसिक बेचैनी राहील. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता आहे. आज नवे काम आज सुरू करू नये. आणखी वाचा
मिथुन - आजचा दिवस आनंददायी आहे. शरीर व मन आनंदी राहील. कुटुंबीय व मित्र परिवार यांच्यासह एकाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. स्वादिष्ट भोजन मिळेल. नव्या कपड्यांची खरेदी होईल. आणखी वाचा
कर्क - आजचा दिवस खुशीचा व यशाचा आहे. कुटुंबात सुख - शांती व समाधान राहील. नोकरदारांना कार्यालयात अनुकूल वातावरण राहील. नोकर वर्गाकडून व मातुल घराण्याकडून लाभ होईल. आणखी वाचा
सिंह - आज आपण शारीरिक व मानसिक दृष्टया शांतपणे काम कराल. सृजनात्मक कामांची अधिक गोडी लागेल. साहित्य व कला क्षेत्रांत काही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा मिळेल. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. अनेक गोष्टींची काळजी लागून राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. आणखी वाचा
तूळ - आज नशिबाची साथ लाभेल. भावंडांशी सौहार्दतेचे संबंध राहतील. एखाद्या प्रवासाचे नियोजन कराल. नवीन कार्यारंभास आजचा दिवस अनुकूल आहे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आणखी वाचा
वृश्चिक - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. वाणी संयमित ठेवल्यास कुटुंबात सुख - शांति नांदू शकेल. विचारांवर असलेला नकारात्मक पगडा दूर सारावा लागेल. आणखी वाचा
धनु - आज शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. नियोजित कामे करु शकाल. आर्थिक फायदा होईल. प्रवास संभवतात. नातेवाइकां कडील एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. स्वकीयांना भेटून आनंद होईल. आणखी वाचा
मकर - आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. कामांमध्ये सहकार्यांचा हस्तक्षेप वाढेल. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात व्यस्तता वाढेल व त्यात खर्चही होऊ शकतो. आरोग्य विषयक चिंता राहील. आणखी वाचा
कुंभ - नवीन कार्य सुरु करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. नोकरी - व्यवसायात फायदा संभवतो. एखाद्या स्त्रीमुळे आपली कामे होतील. आज मोठे आर्थिक लाभ होतील. सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. संततीशी सलोख्याचे संबंध राहतील. आणखी वाचा
मीन - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामे यशस्वीपणे होऊ शकतील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश झाल्याने आपला दिवस आनंदात जाईल. व्यापार वृद्धी होईल. वडील व वडिलधाऱयां कडून फायदा होईल. एखादा मोठा आर्थिक लाभ संभवतो. आणखी वाचा