Daily Top 2Weekly Top 5

Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - 2 नोव्हेंबर 2022 : कुंभसाठी खर्चाचा अन् कर्कसाठी लाभाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2022-11-02 07:15:192022-11-02 07:23:43 | Updated: 2022-11-02 07:23:43

Today's Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष - आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपण कुटुंबीयांसह घरगुती बाबींचा महत्वपूर्ण विचार - विनिमय कराल. घराचा कायापलट करण्याच्या नवीन योजना आखाल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसह महत्वपूर्ण मुद्दयांवर विचार - विमर्श कराल. आणखी वाचा

वृषभ - आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज विदेशात राहणारे नातलग किंवा मित्र यांच्या कडून सुखद बातमी मिळाल्याने मनाला प्रसन्नता लाभेल.  आणखी वाचा

मिथुन - आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हितावह राहील. शक्यतो नवीन कार्य किंवा औषधोपचार आज सुरू करू नये. रागावर संयम ठेवला नाही तर एखाद्या अप्रिय प्रसंगास सामोरे जावे लागेल. आणखी वाचा

कर्क  - आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. समृद्ध जीवनशैली व मनोरंजक वृत्ती ह्यामुळे आज आपण आनंदी राहाल. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. प्रकृती उत्तम राहील.  आणखी वाचा

सिंह - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबियांशी बोलताना वाणीवर संयम ठेवावा. दैनंदिन कामात विघ्ने येतील. कार्यपूर्तीत अडचणी येतील. आणखी वाचा

कन्या - आज शक्यतो वाद व चर्चा ह्यापासून दूर राहणे हितावह राहील. अचानकपणे खर्चात वाढ होईल. विद्यार्थी वर्गाला शिक्षणात अडचणी येतील. प्रिय व्यक्तीचा सहवास घडल्याने मन आनंदित होईल. पोटाच्या तक्रारी वाढू शकतील.  आणखी वाचा

तूळ - आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मनात हळवेपणा जास्त प्रमाणात राहील. शारीरिक उत्साहाचा अभाव जाणवेल. मानसिक तणाव सुद्धा असेल. धनाची तसेच कीर्तीची हानी होईल. आणखी वाचा

वृश्चिक - आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. नवीन कार्याचा आरंभ करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. दिवसभर मन आनंदी राहील. भावंडांशी घराविषयी महत्वाची चर्चा कराल. आर्थिक लाभ संभवतात. नशिबाची साथ लाभेल. आणखी वाचा

धनु - आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. काही गैरसमजामुळे निर्णयाप्रत जाणे अवघड होईल. मन दुःखी राहील. कुटुंबियांशी मतभेद संभवतात.  आणखी वाचा

मकर - आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. नोकरी - व्यवसायात आपली प्रतिष्ठा वाढेल. पदोन्नती संभवते. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील.  आणखी वाचा

कुंभ - आज कोणाला जामीन राहणे, पैसे देणे - घेणे करू नका. खर्च वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. कोणाशी गैरसमजाने भांडण होऊ शकेल.  आणखी वाचा

मीन - आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज मित्रां कडून आपणाला लाभ होईल व त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. सामाजिक कार्यात गोडी वाटेल. मित्र व वडीलधार्‍यांशी संपर्क साधू शकाल. एखाद्या रम्यस्थळी सहलीचे नियोजन कराल. आणखी वाचा  

टॅग्स :फलज्योतिष
Open in App