आजचे राशीभविष्य, २९ डिसेंबर २०२२: धनु राशीच्या लोकांना नव्या कामासाठी अनुकूल दिन, दिवस आनंदात जाणार

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-12-29 07:17:55 | Updated: December 29, 2022 07:17 IST

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष: आजचा दिवस मित्र व सामाजिक कार्ये ह्यांच्यासाठी धावपळ करण्यात जाईल. पैसा सुद्धा खर्च होईल. नवीन मित्रांच्या ओळखी होतील. भविष्यात त्यांचा उपयोग होईल. सरकारी कामे सफल होतील. मोठयांचा सहवास लाभेल, त्यांना भेटून आनंद होईल. आणखी वाचा 

वृषभ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विशेषतः व्यापार - व्यवसाय करणार्यांना आजचा दिवस अत्यंत लाभदायक आहे. नोकरीत पदोन्नती संभवते. कार्यालयात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आणखी वाचा 

मिथुन: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आज आपणास मानसिक व्यग्रता व शारीरिक शिथिलता अनुभवास येईल. काम करायला उत्साह वाटणार नाही. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांचे सहकार्य मिळणार नाही. पैसा खर्च होईल. आणखी वाचा 

कर्क: आज वैचारिक नकारात्मकता मनात असल्याने दिवसभर आपण अस्वस्थ राहाल. रागावर आज संयम ठेवावा लागेल. खर्च अधिक होईल. कुटुंबियांशी संघर्ष संभवतो. आज नवीन कामे सुरू करू नये. नवे परिचय सुद्धा लाभदायी होणार नाहीत. आणखी वाचा 

सिंह:  आज वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची सुद्धा शक्यता आहे. भागीदार व व्यापारी ह्यांच्याशी शांतपणे व्यवहार करावा. शक्यतो निरर्थक चर्चा किंवा वाद ह्यापासून दूर राहावे. आणखी वाचा 

कन्या:  आज उत्साह व स्वास्थ्य उत्तम राहील. घरी व नोकरीच्या ठिकाणी वातावरण आनंदी राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल. स्त्रीयांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल. आणखी वाचा 

तूळ:  आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. संततीची काळजी सतावेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील. वाद - विवाद, बौद्धिक चर्चा ह्यापासून शक्यतो दूर राहावे. आज सुरू केलेले काम पूर्ण होऊ शकणार नाही. आणखी वाचा 

वृश्चिक: आजचा दिवस शक्य तितक्या शांतचित्ताने घालवावा. चिंतातुर मन व अस्वस्थ शरीर ह्याचा आपणास त्रास होईल. संबंधीतांशी मतभेद संभवतात. आर्थिक हानीची शक्यता आहे. आणखी वाचा 

धनु: आज आपण प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आजचा दिवस नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल आहे. मित्रांसह दिवस आनंदात घालवाल. आज आपल्या जीवनात आनंद ओसंडून वाहू लागेल. आणखी वाचा 

मकर: आज कुटुंबियांशी वाद होण्याची शक्यता आहे. बोलण्यातील संयमच आपणाला वादातून बाहेर काढेल. सट्टे बाजारात गुंतवणूक करण्याचे नियोजन कराल. प्रकृती साधारणच असेल. आणखी वाचा 

कुंभ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी राहाल. व्यावहारिक अनुभव चांगले येतील. कुटुंबीयांसह प्रवासाचा व स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्याल. मिळालेच्या भेट वस्तूंमुळे आनंदी राहाल. आणखी वाचा 

मीन: आज अतीलोभ व हव्यास ह्यात आपण फसण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार सावधपणे करावेत. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण विचार करा. प्रकृती बिघडू शकते. मनाची एकाग्रता होणार नाही.  आणखी वाचा 

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App