Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २९ जुलै २०२२: ‘या’ ५ राशींना नोकरी, व्यवसायात लाभ; मनःशांतीचा प्रसन्न दिवस

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-07-29 07:18:35 | Updated: July 29, 2022 07:18 IST

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष: आज आपणाला अतिशय संवेदनशीलता जाणवेल. आज आपल्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. घर, जमीन इत्यादींशी संबंधित व्यवहार शक्यतो आज करू नयेत. मानसिक उदवेग दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी आहे. अधिक वाचा

वृषभ: आज आपण अती संवेदनशीलतेमुळे व भावूक विचारांमुळे खूप हळवे व्हाल. आपली व इतरां विषयीची काळजी दूर झाल्यामुळे मनाला दिलासा मिळेल. कल्पनाशक्ति व सृजनशीलतेने काम कराल. कुटुंबीय व मित्रांसह स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. अचानकपणे प्रवास करावा लागेल. अधिक वाचा

मिथुन: आज नातलग व मित्रांशी संवाद साधल्याने आपण आनंदित व्हाल. सुरवातीस आर्थिक नियोजनात काही अडचणी येतील. पण नंतर सहजपणे ते काम पार पाडू शकाल. महत्वाच्या कामाची सुरुवात उशीरा होईल पण नंतर मात्र सहजगत्या ती पार पडतील. त्यामुळे मनःशांती अनुभवू शकाल. अधिक वाचा

कर्क: आज आपल्या मनात प्रेमालापाचे तरंग उमटतील. दिवसभर त्याच मनःस्थितीत आपण राहाल. मित्र, स्वकीय व संबंधितांकडून भेट वस्तू मिळतील. त्यांच्यासह आपण आपला दिवस आनंदात घालवाल. प्रवास, मनपसंत भोजन व प्रिय व्यक्तीचा सहवास ह्यामुळे प्रफुल्लित राहाल. पत्नीच्या सहवासात मन प्रसन्न राहील. अधिक वाचा

सिंह: आज कोर्ट - कचेरीच्या प्रश्नात सावध राहावे लागेल. आज मनात भावनांचा कल्लोळ उठेल. त्यामुळे हातून काही अवैध कृत्य घडण्याची शक्यता आहे. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. उक्ती व कृती ह्यात समतोल साधावा लागेल. विदेशातून एखादी आनंददायी बातमी येईल. अधिक वाचा

कन्या: आजचा दिवस लाभदायी आहे. मित्रांसह एखादा आनंददायी प्रवास होईल. दांपत्य जीवनात जादा जवळीक निर्माण होईल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. धनप्राप्ती साठी आजचा दिवस अनुकूल आहे. व्यापारातील पैसे मिळविण्यासाठी प्रवास करावा लागेल. अधिक वाचा

तूळ: आज आपणाला नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांची आपल्यावर मर्जी राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. मनात भावनात्मकता वाढेल. मातुल घराण्याकडून फायदा होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. आजचा दिवस व्यवसायात यश प्राप्तीचा आहे. अधिक वाचा

वृश्चिक: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. लेखन - साहित्य संबंधित काम कराल. व्यवसायातील वातावरण आपणास प्रतिकूल असेल. वरिष्ठ आपल्यावर नाराज होतील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. संततीशी मतभेद होतील. प्रवासाची शक्यता आहे. अधिक वाचा

धनु: आज आपणास खाण्या - पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कामात यश मिळण्यास विलंब झाल्याने नैराश्य येईल. काम वेळेवर पूर्ण होणार नाही. कामाचा व्याप वाढेल. शक्यतो आज नवे काम हाती घेऊ नये. आपल्या बोलण्यावर संयम ठेवाव लागेल. खर्चात वाढ होईल. अधिक वाचा

मकर: दैनंदिन काम सोडून आज आपण मनोरंजन व गाठी भेटी ह्यात आपला वेळ घालवाल. स्वादिष्ट भोजन मिळेल. मित्रांसह फिरायला जाल. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासात वेळ चांगला घालवाल. मोठ्या धनलाभाची संभावना आहे. व्यापार वाढेल. भागीदारीतून लाभ होईल. मान-सन्मान वाढतील. अधिक वाचा

कुंभ: सांप्रत काली आपणास कार्यात यश मिळाल्याने प्रसिद्धी सुद्धा मिळेल. स्वभावात जास्त हळुवारपणा राहील. स्त्रीयांना माहेरहून अनेक चांगल्या बातम्या मिळतील. घरात उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीत सुद्धा सहकारी उत्तम सहकार्य करतील. शरीर व मन प्रसन्न राहील. अधिक वाचा

मीन: आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी अनुकूलतेचा आहे. अभ्यासात यश व प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कल्पनाशक्तीच्या जोरावर साहित्य क्षेत्रात लेखनाचे नवे काम कराल. प्रेमीजनांना परस्परांचा सहवास लाभेल. आपल्या स्वभावात जास्त हळवेपणा राहील. अधिक वाचा

 

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App