Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०२ ऑगस्ट २०२२: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना शुभ फलदायी अन् प्रसन्नतेचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-08-02 07:36:13 | Updated: August 2, 2022 07:36 IST

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक थकवा जाणवेल. आज शक्यतो प्रवास टाळावा. हट्टीपणा सोडून द्यावा. पोटाच्या तक्रारी उदभवतील, तेव्हा प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. संततीची काळजी राहील. कामात यश लाभेल. कामाच्या धावपळीमुळे कुटुंबीयांसाठी वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांच्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे. अधिक वाचा

वृषभ: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. पैतृक संपत्ती पासून लाभ संभवतात.वडील आपणांशी खूप चांगल्या रीतीने वागतील. खेळाडू व कलाकारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. त्यांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. संततीसाठी खर्च करावा लागेल. अधिक वाचा

मिथुन: आजचा दिवस आनंददायी आहे. भावंडे, मित्र, शेजारी ह्यांच्याशी संबंध चांगले राहतील. आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल. गुंतवणूक करताना विचारपूर्वकच पैसे गुंतवावेत. मनाच्या चंचलतेमुळे विचार सतत बदलतील. तन - मनाला स्फूर्ती लाभेल. नवीन कामाचा आरंभ करण्यास दिवस अनुकूल आहे. विरोधकांना नामोहरम करू शकाल. नशीबाची साथ लाभेल. अधिक वाचा

कर्क: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मनात मरगळ राहील. केलेल्या कामाचे समाधान वाटणार नाही. प्रकृती ठीक राहणार नाही. उजव्या डोळ्याला त्रास होण्याची शक्यता आहे. कुटुंबात मतभेद होतील. मानसिक दृष्टीकोन नकारात्मक राहील. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येतील. सर्व प्रकारच्या अवैध बाबींपासून दूर राहणे हितावह राहील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. अधिक वाचा

सिंह: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक काम दृढ विश्वासाने पूर्ण करू शकाल. सरकारी कामात यश मिळेल. वडील व वडीलधार्यांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान होतील. उतावीळपणा सोडावा लागेल. काही कारणाने आपला संताप वाढेल. पूर्ण दिवस आनंदात जाईल. अधिक वाचा

कन्या: दिवसभर शारीरिक व मानसिक चिंतेच्या दडपणाखाली राहाल. आज कोणाशीही अहंपणामुळे वाद होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कोर्ट-कचेरी संबंधी कामात सावध राहावे लागेल. अचानकपणे खर्च उदभवतील. मित्रांचे गैरसमज होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. धार्मिक कार्यावर खर्च होईल. शांत चित्ताने काम करा. संतापामुळे कामात व्यत्यय येईल. मानसिक बेचैनी जाणवेल. तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल. अधिक वाचा

तूळ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विविध स्तरांवर लाभ संभवतात. मित्रांच्या भेटी होऊन एखाद्या रमणीय स्थळी सहलीला जाऊ शकाल. घरात पत्नी व संतती ह्यांच्या कडून काही सुखद बातमी मिळेल. धनप्राप्ती संभवते. प्राप्तीत वाढ होईल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. एखाद्या स्त्रीमुळे फायदा होईल. मनासारखे वैवाहिक सौख्य उपभोगू शकाल. अधिक वाचा

वृश्चिक: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात आनंद व उल्हास राहील. सर्व कामे विना विलंब पूर्ण होतील. मान-सन्मान होतील. नोकरीत पदोन्नती संभवते. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. तब्बेत उत्तम राहील. धनलाभ संभवतो. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. मित्र व संबंधितां कडून लाभ होतील. संततीची समाधान कारक प्रगती होईल. अधिक वाचा

धनु: आज प्रवासात अडचणी येतील. शरीरास थकवा जाणवेल. प्रकृती सुद्धा नरम गरम राहील. मनात चिंता व व्याकुळता राहील. संतती विषयी काळजी वाटेल. व्यवसायात अडचणी येतील. नशीबाची साथ मिळणार नाही. जोखमीच्या कामा पासून शक्यतो दूर राहावे. कार्य साफल्य होणे कठीण आहे. वरिष्ठांशी संघर्ष होतील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. अधिक वाचा

मकर: आज नोकरी - व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहील. कार्यालयीन कामे कौशल्य पूर्वक कराल. व्यावहारिक व सामाजिक कामासाठी प्रवास करण्याची संधी मिळेल. खाणे- पिणे, हिंडणे- फिरणे ह्याकडे लक्ष राहील. अचानकपणे खर्च उदभवतील. भागीदारीत मतभेद संभवतात. गुडघेदुखीचा त्रास संभवतो. संताप व नकारात्मक विचारां पासून दूर राहणे हितावह राहील. नवीन काम सुरू करण्यास आजचा दिवस अनुकूल नाही. अधिक वाचा

कुंभ: आजचा दिवस प्रसन्नतेचा आहे. आपला आत्मविश्वास वाढल्याने कामात यश मिळणे सहज शक्य होईल. स्वभावातील मौजवृत्ती मनाला स्फूर्ती देईल. भिन्नलिंगी व्यक्तीशी परिचय होऊन त्याचे परिवर्तन प्रणयात होण्याची शक्यता आहे. जवळचा प्रवास घडेल. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा वाढेल. स्वादिष्ट भोजन, वस्त्र व वाहनसुख मिळेल. भागीदारीत लाभ होण्याची शक्यता आहे. अधिक वाचा

मीन: मनाचा खंबीरपणा व आत्मविश्वास आपले काम यशस्वी करील. कुटुंबात सुख - शांती, आनंदाचे वातावरण राहील. राग व बोलण्याची उद्धट पद्धत यांवर संयम ठेवा. नोकरीत वर्चस्व राहील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. आजारी व्यक्तीची प्रकृती सुधारेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा अनुभव येईल. अधिक वाचा

 

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App