आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस

By ऑनलाइन लोकमत | Follow 2025-10-30 07:02:04 | Updated: October 30, 2025 07:02 IST

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

Today Daily Horoscope: 

मेष:  आज आपण कुटुंबीयांसह घरगुती बाबींचा महत्वपूर्ण विचार-विनिमय कराल. घराचा कायापलट करण्याच्या नवीन योजना आखाल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसह महत्वपूर्ण मुद्दयांवर विचार-विमर्श कराल. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करावा लागेल. लाभ संभवतो. एखाद्या कामास किंवा प्रकल्पास सरकारी मदत मिळेल. कामाचा व्याप वाढल्याने अस्वस्थ राहाल. आणखी वाचा 

वृषभ:  आज विदेशात राहणारे नातलग किंवा मित्र यांच्याकडून सुखद बातमी मिळाल्याने मनाला प्रसन्नता लाभेल. परदेशी जाण्याची इच्छा असणार्‍या लोकांना आजचा दिवस अनुकूल आहे. दूरचे प्रवास करण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढेल. व्यापार-व्यवसायात लाभ होईल. स्वास्थ्य साधारण राहील. आणखी वाचा 

मिथुन: आज एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. रागामुळे स्वतःचीच हानी होण्याची शक्यता असल्याने डोके शांत ठेवा. मानहानी संभवते. आज आपण मनाने अस्वस्थ असाल. बोलण्यावर ताबा ठेवून वादविवाद टाळणे हेच आपल्या हिताचे आहे. अतिरिक्त खर्चामुळे आर्थिक चणचण जाणवेल. मानसिक शांतीसाठी प्रयत्न करा. आणखी वाचा 

कर्क: समृद्ध जीवनशैली व मनोरंजक वृत्ती ह्यामुळे आज आपण आनंदी राहाल. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. प्रकृती उत्तम राहील. मान-प्रतिष्ठा वाढेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखू शकाल. आणखी वाचा 

सिंह:  आज आपले मन चिंतेने व्यग्र असेल. एक प्रकारची उदासीनता येईल. दैनंदिन व्यवहारात विघ्न येऊ शकतात. सहकार्‍यांचे सहकार्य आज अजिबात मिळणार नाही. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. केलेल्या कष्टाचे श्रेय न मिळल्याने मन उदास होईल. आणखी वाचा 

कन्या:  आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल आहे. संततीविषयी चिंता लागून राहील. सट्टा-शेअर बाजार ह्यात सावध राहून व्यवहार करावेत. मन दु:खी असेल. आज कोणत्याही बौद्धिक चर्चेत भाग घेऊ नये. आणखी वाचा 

तूळ: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मनात हळवेपणा जास्त प्रमाणात राहील. शारीरिक उत्साहाचा अभाव जाणवेल. मानसिक तणाव असेल. धनाची तसेच कीर्तीची हानी होईल. जवळच्या नातलगांशी संघर्ष किंवा वाद झाल्याने मनाला यातना होतील. आणखी वाचा 

वृश्चिक: आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक लाभ होतील. नशिबाची साथ मिळेल. मित्रांबरोबरच्या संबंधात सौहार्दता असेल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी आज अनुकूलता लाभेल. एखादा प्रवास ठरवाल. मन प्रसन्न राहील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय प्राप्त कराल. आणखी वाचा 

धनु: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. काही गैरसमजामुळे निर्णयाप्रत जाणे अवघड होईल. मन दुःखी राहील. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. कामात अपेक्षित यश न मिळाल्याने मन निराश होईल. कामाचा व्याप वाढेल. अकारण खर्च वाढतील. आणखी वाचा 

मकर: मन प्रफुल्लित असेल. आज एखादे मंगलकार्य आपण करू शकाल. वातावरण मंगलमय बनेल. मित्र, स्नेही यांच्याकडून आपणास भेटवस्तू मिळतील. व्यापार- व्यवसायात वर्चस्व राहील. आपल्या कामगिरीवर वरिष्ठ खूष होतील. कामे सहजपणे पार पडतील. अनुकूल परिस्थितीचा आपण फायदा करून घ्यावा. मन शांत राहील. शारीरिक कष्ट होतील. आणखी वाचा 

कुंभ: आज मन व शरीर अस्वस्थ राहील. कुटुंबियाशी मतभेद संभवतात. आर्थिक देवाण - घेवाण किंवा गुंतवणूक करताना सावध राहावे. कामात सावध राहावे लागेल. खर्च वाढेल. स्वतः तोटा सोसूनही कोणाचे तरी भले कराल. वाणी व राग ह्यावर संयम ठेवावा लागेल. एखादा अपघात संभवतो. आणखी वाचा 

मीन:  आज अचानक धनलाभ संभवतो. संततीकडून चांगली बातमी मिळेल. बालपणीचे किंवा जुने मित्र भेटल्याने आनंदीत व्हाल. नवीन मित्रांशी संपर्क होईल व त्याचा भविष्यात फायदा होईल. सामाजिक प्रसंगात भाग घेण्यासाठी बाहेर जावे लागेल. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. एखाद्या रमणीय स्थळाला भेट द्याल. आणखी वाचा 

 

English
हिंदी सारांश
Web Title : October 30, 2025 Horoscope: Government aid, financial gains, old friends meet.

Web Summary : Aries benefits from government aid. Taurus receives good news from abroad. Gemini faces potential losses, while Cancer enjoys happiness. Scorpio gains financially, and Capricorn finds peace. Aquarius should be cautious, while Pisces may receive unexpected wealth.
टॅग्स :दैनिक राशीभविष्यफलज्योतिषराशी भविष्य
Open in App