Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2026-04-12 06:16:052026-04-12 06:16:57 | Updated: 2026-04-12 06:16:57

Today Daily Horoscope 12 April 2026 : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष: आज आपल्या एखाद्या कामास किंवा प्रकल्पास सरकारी लाभ मिळतील. कामाच्या ठिकाणी महत्वाच्या मुद्दयासंबंधी वरिष्ठांशी विचार-विनिमय होतील. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करावा लागेल. कार्यभार वाढेल. कौटुंबिक गोष्टीत मनापासून रस घेऊन कुटुंबियाबशी सल्ला-मसलात कराल. गृहसजावटीचे आयोजन कराल. आणखी वाचा 

वृषभ: आज विदेश गमनाच्या सुवर्णसंधी येतील. परदेशातील मित्राकडून बातम्या समजतील. व्यापार्‍यांना व्यापारात धनलाभ होईल. नवे बेत हाती घ्याल. दूरचे प्रवास होतील. एखाद्या विषयात प्रगती होईल. संततीची प्रगती होईल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा 

मिथुन: आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने प्रत्येक बाबतीत सावध राहावे लागेल. नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील. क्रोधामुळे काही अनिष्ट होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. घरात किंवा कार्यालयात वाणीवर ताबा ठेवा. वाद टाळा. काही कारणाने खाण्या - पिण्याची आबाळ होऊ शकते. मनास शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. आणखी वाचा 

कर्क: आजचा दिवस सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रांत आपणाला लाभदायक ठरेल. मौज - मजेची साधने, उत्तम दागीने व वाहन खरेदी होईल. मौज - मस्ती व मनोरंजनात वेळ खर्च होईल. तसेच सुखद अनुभव देईल. दांपत्य जीवनात उत्कट प्रेमाचा अनुभव येईल. भागीदारीत फायदा होईल. सहलीची शक्यता आहे. आणखी वाचा 

सिंह: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. घरात शांतता नांदेल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्‍यांचे अपेक्षित सहकार्य मिळविण्यात अडचणी येतील. दैनिक कामात अडथळे येतील. शत्रू व प्रतिस्पर्ध्यांमुळे त्रास होईल. वरिष्ठांशी वाद संभवतात. उदासीनता व साशंकता अधिक प्रमाणात राहिल्याने मन उदास होईल. प्रकृती साधारण राहील. प्रयत्नांच्या मानाने यश कमीच मिळेल. आणखी वाचा 

कन्या: आज संतती विषयक काही चिंता निर्माण होतील. मन विचलीत होईल. यातना होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. अचानक खर्च उद्भवतील. बोलताना बौद्धिक चर्चेपासून दूर राहणे हितावह राहील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. शेअर्स, लॉटरीत नुकसान संभवते. आणखी वाचा 

तूळ: आज सावध राहावे लागेल. वैचारिक सुज्ञपणा मानसिक स्वास्थ्य देईल. चिंता राहील. शक्यतो प्रवास स्थगित ठेवा. वेळेवर भोजन व पुरेशी झोप न मिळाल्याने शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. कौटुंबिक मिळकती संबंधी सावधपणे काम करणे हितावह ठरेल. आणखी वाचा 

वृश्चिक: आज दिवसभर आपण आनंदित राहू शकाल. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल. सहकार्‍यांकडून सौख्य व आनंद मिळेल. मित्र व नातलगांची भेट होईल. कोणत्याही कामात आज यश मिळेल. आर्थिक फायदा होईल. नशिबाची साथ मिळेल. भावंडांकडून लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. स्नेह संबंध जुळतील. छोटे प्रवास होतील. आणखी वाचा 

धनु: आज कुटुंबीयांशी गैरसमज व मतभेद होतील. वायफळ खर्च होईल. मानसिक चंचलता व द्विधा मनःस्थिती ह्यामुळे महत्वाचे निर्णय आज आपण घेऊ शकणार नाही. कामात अपेक्षित यश मिळणार नाही. दूरसंचार माध्यमातून दूरच्या ठिकाणी होणारा संपर्क लाभदायक ठरेल. आणखी वाचा 

मकर: आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. नोकरी - व्यवसायात आपली प्रतिष्ठा वाढेल. पदोन्नती संभवते. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. सांभाळून राहा. मित्र परिवार व स्नेहीजनांचा सहवास घडल्याने मानसिक शांती लाभेल. आणखी वाचा 

कुंभ: आर्थिक व्यवहार तसेच जमीन - जुमल्यांच्या व्यवहारात आज कोणाला जामीन न राहणे हितावह राहील. मानसिक एकाग्रता राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करावी. आपल्या निर्णयाशी कुटुंबीय सहमत होणार नाहीत. इतरांच्या बाबींत हस्तक्षेप केल्यास काही नुकसान संभवते. संभ्रमावस्था व अचानक संकट ह्यांचा सामना करावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा 

मीन: आज मित्रांकडून आपणाला लाभ होईल व त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. सामाजिक कार्यात गोडी वाटेल. मित्र व वडीलधार्‍यांशी संपर्क साधू शकाल. एखाद्या रम्य स्थळी सहलीचे नियोजन कराल. नवे स्नेह - संबंध जुळतील व भविष्यात त्याच्यांकडून लाभ होईल. घरातून चांगली बातमी मिळेल. संततीकडून लाभ होईल. अचानक धनलाभ संभवतो. आणखी वाचा 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Today's Horoscope: April 12, 2026 - Check Your Zodiac Sign!

Web Summary : Daily horoscope for April 12, 2026, is here! Find out what the stars have in store for you. Read detailed predictions for each zodiac sign, from Aries to Pisces, and plan your day accordingly. Discover insights into your career, love life, and well-being.
Web Title : आज का राशिफल: 12 अप्रैल, 2026 - अपनी राशि की जाँच करें!

Web Summary : 12 अप्रैल, 2026 का दैनिक राशिफल यहाँ है! पता करें कि सितारे आपके लिए क्या लेकर आए हैं। मेष से लेकर मीन राशि तक, प्रत्येक राशि के लिए विस्तृत भविष्यवाणियाँ पढ़ें और उसी के अनुसार अपने दिन की योजना बनाएं। अपने करियर, प्रेम जीवन और कल्याण के बारे में जानकारी प्राप्त करें।
टॅग्स :दैनिक राशीभविष्यफलज्योतिषराशी भविष्यअध्यात्मिक
Open in App