Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य, ०७ फेब्रुवारी २०२६: धनप्राप्ती, चांगली बातमी मिळेल, यश-कीर्ती-लाभ

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2026-02-07 06:10:492026-02-07 06:44:55 | Updated: 2026-02-07 06:44:55

Today Daily Horoscope 07 February 2026: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष: आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी आहे. कुटुंबातील आनंददायी वातावरण मनाला प्रफुल्लित राहण्यात मदत करेल. घरात सुखद प्रसंग घडतील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. सामाजिक क्षेत्रात यशकीर्ती लाभ होईल. व्यापारात भागीदारांशी चांगले संबंध राहतील. वैवाहिक जोडीदाराशी जवळीक वाढेल. आणखी वाचा 

वृषभ:  आज वाद होण्याची शक्यता असल्याने बौद्धिक चर्चेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मनाला काळजी लागून राहील. मानसिक दृष्टया तणाव दूर झाल्याचा अनुभव येईल. केलेल्या कामाची प्रशंसा झाल्याने आपणाला आनंद होईल. स्त्रियांना माहेरहून एखादी चांगली बातमी मिळेल. आणखी वाचा 

मिथुन: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. संपत्ती विषयक दस्तावेजात फसवणूक होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी लागेल. कुटुंबियांशी विनाकारण वाद होतील. संतती विषयक चिंता निर्माण होईल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी निर्माण होतील. अचानकपणे खर्च उद्भवतील. मित्रांचा सहवास घडल्याने आनंद होईल, इतकीच काय ती जमेची बाजू असेल. आणखी वाचा 

कर्क: आज हातून एखादे कार्य अविचाराने होईल, तेव्हा काळजी घ्यावी. आप्तस्वकीयांच्या भेटीने आनंद होईल. त्यांच्याशी प्रेमपूर्ण संबंधामुळे आनंद वृद्धिंगत होईल. मनोबल चांगले असल्याने प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे लागेल. चिंतीत व्हाल. खर्चात वाढ संभवते. आणखी वाचा 

सिंह: आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. गोड बोलण्याने इतरांकडून आपली कामे करवून घ्याल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. आप्तेष्टांकडून काही लाभ संभवतो. मित्रांचा सहवास घडेल. विरोधकांशी दोन हात करू शकाल. संबंधातील प्रेमळपणामुळे स्वभाव मृदु होईल. आणखी वाचा 

कन्या: वाणीच्या प्रभावाने मोठे लाभ होतील. इतर लोकांशी असणार्‍या संबंधात प्रेमवृद्धी होईल. प्रवास आनंददायी होईल. व्यावसायिक क्षेत्रातही लाभ होईल. घरगुती वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ होईल. विदेशातील व्यापारात यश व लाभ प्राप्ती होईल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. आणखी वाचा 

तूळ: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे मित्रांशी वाद होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपल्या वक्तृत्वाने इतरांची मने जिंकाल. आणखी वाचा 

वृश्चिक:  आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. अनेक प्रकारचे लाभ आपणास मिळू शकतील. आपली कीर्ती वाढेल. धनप्राप्ती होईल. मित्रांसाठी पैसे खर्च होतील. त्याच बरोबर त्यांच्यासह फिरण्याचा आनंद लुटू शकाल. दुपारनंतर मात्र, अस्वस्थता जाणवेल. एखाद्याशी वाद संभवतो. स्वभावात तापटपणा वाढेल. आणखी वाचा 

धनु:  आजचा दिवस लाभदायी आहे. कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील. व्यापार-व्यवसायात लाभ होईल. सरकारी कामातून लाभ होतील. अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल. व्यापारात व प्राप्तीत वृद्धी होईल. एखाद्या सहलीस जाऊ शकाल. आणखी वाचा 

मकर: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. परदेशस्थ नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळाल्याने आनंदित व्हाल. प्रवास संभवतो. कामासंबंधी एखादी योजना आकार घेईल. व्यापारात फायदा होईल. आणखी वाचा 

कुंभ:  आज आपण जर आपल्या रागावर व वाणीवर संयम ठेवलात तर आजचा दिवस आपण आनंदात घालवू शकाल. कुटुंबियांशी संभाव्य वाद टाळू शकाल. दुपारनंतर मित्रांच्या सहवासात आनंदात वेळ घालवू शकाल. प्रवास संभवतो. विदेशातून एखादी चांगली बातमी ऐकिवात येईल. आणखी वाचा 

मीन: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. दैनंदिन कामे शांततेत पूर्ण होतील. मित्रांसह एखाद्या मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल. भागीदाराशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होऊ शकतील. दुपारनंतर बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. आर्थिक खर्च वाढतील.  आणखी वाचा 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Horoscope Today, February 7, 2026: Monetary Gains, Good News, Success

Web Summary : Aries benefits in business, family happiness. Taurus: avoid arguments. Gemini faces property issues. Cancer: caution needed. Leo enjoys family time. Virgo: gains from communication. Libra: moderate day. Scorpio: monetary gains. Sagittarius: profitable day. Capricorn: good news. Aquarius: control anger. Pisces: mixed day.
Web Title : आज का राशिफल, 7 फरवरी 2026: धन लाभ, शुभ समाचार, सफलता

Web Summary : मेष राशि के जातकों को व्यवसाय में लाभ, परिवार में सुख। वृषभ: विवादों से बचें। मिथुन: संपत्ति संबंधी समस्याएं। कर्क: सावधानी बरतें। सिंह: परिवार के साथ समय बिताएं। कन्या: संचार से लाभ। तुला: मध्यम दिन। वृश्चिक: धन लाभ। धनु: लाभदायक दिन। मकर: शुभ समाचार। कुंभ: क्रोध पर नियंत्रण रखें। मीन: मिश्रित दिन।
टॅग्स :दैनिक राशीभविष्यफलज्योतिषराशी भविष्यअध्यात्मिक
Open in App