Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०६ ऑगस्ट २०२२: ‘या’ ५ राशींना नशिबाची साथ अन् आर्थिक लाभाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-08-06 07:17:00 | Updated: August 6, 2022 07:17 IST

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष: आज आपणास सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रातून प्रशंसा प्राप्त होईल. आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल. वाहन सुख मिळेल. प्रिय व्यक्तीचे प्रेम प्राप्त करू शकाल. विचारात उग्रता व अधिकाराची भावना वाढेल. बौद्धिक चर्चेत भाग घेण्याची संधी प्राप्त होईल. समाधानि वृत्ती बाळगणे आवश्यक राहील. अधिक वाचा

वृषभ: आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सांभाळून नियोजित कामे ठरल्या प्रमाणे पूर्ण करू शकाल. आजारी व्यक्तींना आज प्रकृतीत सुधारणा जाणवेल. मातुल घराण्या कडून चांगली बातमी समजेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. अडलेली कामे आज पूर्ण होतील. अधिक वाचा

मिथुन: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नवे काम हाती घेऊ शकाल. पत्नी व संतती विषयी चिंता वाटून मनात उद्विग्नता येईल. अजीर्ण झाल्याने प्रकृती नरम-गरम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल दिवस आहे. शक्यतो वादविवाद टाळावेत. मतभेद संभवतात. अधिक वाचा

कर्क: आज सांभाळून राहावे लागेल. शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता लाभण्यासाठी आज प्रयत्न करावे लागतील. छातीत दुखणे किंवा अन्य विकारांचा त्रास संभवतो. कुटुंबियांशी उग्र चर्चा किंवा वाद झाल्याने सुद्धा मन दुःखी होईल. पैसा मोठया प्रमाणावर खर्च होईल. सामाजिक मानहानी संभवते. अधिक वाचा

सिंह: कामात यश व प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्यामुळे मनात प्रसन्नता दरवळेल. भावंडांशी भावदर्शी संबंध प्रस्थापित होतील. मित्र व स्नेही यांच्यासह एखाद्या रमणीय पर्यटन स्थळी हिंडण्या - फिरण्याचा आनंद घेऊ शकाल. प्रकृती सुद्धा एकदम उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. मनात उद्विग्नता येणार नाही. नशिबाची साथ मिळेल. अधिक वाचा

कन्या: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपल्या मधुर वाणीचा इतरांच्या मनावर सकारात्मक प्रभाव होईल. घरगुती वातावरण चांगले राहील. वाणीवर ताबा ठेवल्याने वादविवाद होणार नाहीत. आर्थिक कामे मनासारखी पार पडतील. नकारात्मक विचारांपासून दूर राहावे लागेल. मित्रांची भेट होईल. अधिक वाचा

तूळ: आज आपल्या प्रत्येक कामात आत्मविश्वास असल्याचे दिसून येईल. आर्थिक योजना व्यवस्थित करू शकाल. शारीरिक व मानसिक शांतता लाभेल. वस्त्रे, अलंकार, आनंद, उल्हास ह्यासाठी खर्च होईल. वैचारिक वाढ होईल. रचनात्मक कार्यात मन रमेल. अधिक वाचा

वृश्चिक: आज आपल्या स्वभावातील तामसवृत्ती व बोलणे ह्यावर संयम ठेवावा लागेल. शारीरिक शैथिल्य व मानसिक चिंता ह्यामुळे मन ग्रासून जाईल. वाहन चालवताना अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी. शक्यतो आज शस्त्रक्रिया टाळावी. स्नेही व कुटुंबीयांशी वाद होण्याची शक्यता आहे. कोर्ट - कचेरीच्या कामात सावध राहा किंवा शक्य असेल तर काम लांबणीवर टाका. अधिक वाचा

धनु: आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील. मित्र व परिवारासह पर्यटन स्थळी भटकण्याचा आनंद मिळेल. व्यापारात लाभदायी ठरणारा दिवस आहे. कुटुंबात सुख - शांती नांदेल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळू शकेल. अधिक वाचा

मकर: कुटुंब व संतती यांच्याविषयी आपणाला आनंद व समाधान होईल. स्नेही व मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल. व्यापारात पैशाच्या वसुलीसाठी बाहेर जावे लागेल व ते फायदेशीर ठरेल. व्यवसायात धन व मान - प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. नोकरीत बढतीची शक्यता आहे. अधिक वाचा

कुंभ: आज प्रतिस्पर्ध्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. शारीरिक अस्वास्थ्य राहील. शैथिल्य व आळस राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरीत चुका होतील. आनंद - मौजमजा ह्यासाठी पैसा खर्च होईल. संतती विषयक काळजी राहील. विदेशातून सुखद बातमी ऐकिवात येईल. अधिक वाचा

मीन: आज अवैध कामा पासून दूर राहावे. क्रोध व वाणीवर संयम ठेवावा लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. सरकार विरोधी कृत्यांपासून दूर राहावे. प्रकृतीच्या देखभालीसाठी पैसा खर्च करावा लागेल. मानसिक बेचैनी जाणवेल. कुटुंबियांशी असणार्‍या संबंधात नकारात्मकता येऊ देऊ नका.  अधिक वाचा

 

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App