Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2026-04-04 06:27:292026-04-04 06:28:25 | Updated: 2026-04-04 06:28:25

Today Daily Horoscope 04 April 2026: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष: आज सुखदायी दांपत्य जीवन, हिंडणे - फिरणे व सगळेच मनासारखे मिळू शकेल. आयात-निर्यात व्यापाराशी संबंधितांना लाभ व यश मिळेल. हरवलेली वस्तू परत मिळेल. प्रिय व्यक्तीशी प्रेमाचा सुखद अनुभव येईल. प्रवास होईल. आर्थिक लाभ व वाहनसुख मिळेल. वाद-विवादापासून दूर राहणे हिताचे ठरेल. आणखी वाचा 

वृषभ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. ठरवलेली कामे व्यवस्थीत पार पडतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. आनंदाच्या बातम्या मिळतील. आजारापासून सुटका होईल. नोकरदारांना लाभ होईल. सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल. आणखी वाचा 

मिथुन: आज सर्वत्र लाभच लाभ आहेत. कौटुंबिक सुख-शांती राहील. पत्नीसाठी खर्च करावा लागेल. अविवाहितांचे विवाह ठरतील. नोकरी-व्यवसायात उत्पन्न वाढेल. घरात शुभकार्ये घडतील. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल. उत्तम भोजन व वैवाहिक सुख मिळेल. आणखी वाचा 

कर्क: आज आनंद व स्फूर्ती ह्यांचा अभाव दिसून येईल. मन खिन्न होईल. काही कारणांनी त्रास होईल. निद्रानाश होईल. सार्वजनिक ठिकाणी स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. पैसा खर्च होईल. आणखी वाचा 

सिंह: आज कार्यातील यश व प्रतिस्पर्ध्यांवर विजयाची धुंदी मनावर राहिल्याने आपणास प्रसन्न वाटेल. भावंडांसह घरात काही बेत ठरवाल. मित्र, स्नेही यांच्यासह एखादा प्रवास होऊ शकेल. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक लाभ व प्रिय व्यक्तीचा सहवास ह्यामुळे खुश व्हाल. शांत चित्ताने नवीन कामाचा आरंभ करा. अचानक नशिबाची साथ मिळेल. आणखी वाचा 

कन्या: आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गोड वाणी व न्यायप्रिय व्यवहार ह्यामुळे लोकप्रियता मिळेल. आर्थिक लाभ होतील. स्वादिष्ट भोजन मिळेल. विद्यार्जनासाठी विद्यार्थ्यांनाआजचा दिवस अनुकूल आहे. हौस-मौज ह्यावर खर्च होईल. अवैध प्रवृत्तीपासून दूर राहावे. आणखी वाचा 

तूळ: आज कला कौशल्य दाखविण्यास सुवर्ण संधी मिळेल. कलात्मक व रचनात्मक शक्ती तेजस्वी बनेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राहील. मनोरंजन कार्यक्रमात मित्र व कुटुंबियांसह सहभागी व्हाल. आर्थिक लाभ होईल. स्वादिष्ट भोजन, वस्त्र व वाहन सुख मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास व कार्य साफल्याची शक्यता आहे. दांपत्य जीवनात गोडी राहील. आणखी वाचा 

वृश्चिक: आज विदेशात राहणारे स्नेही व नातलगांकडून आनंददायी बातम्या मिळतील. लाभ होईल. आनंद प्राप्तीसाठी पैसा खर्च होईल. दांपत्य जीवनात जोडीदाराच्या प्रेमळ सहवासात वेळ घालवाल. सांभाळून काम करणे उचित ठरेल. आणखी वाचा 

धनु: आजचा दिवस लाभदायक आहे. संसारात सुख - शांती नांदेल. प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय राहील. प्रेमाच्या सुखद क्षणांचा आनंद घ्याल. उत्पन्नाचे मार्ग वाढतील. उच्च अधिकारी व वडीलधारी यांची मर्जी राहील. मित्रांसह एखाद्या पर्यटनाचा बेत ठरेल. उत्तम भोजन प्राप्ती मुळे आनंद वाटेल. आणखी वाचा 

मकर: आज व्यापार-व्यवसायात लाभ होईल. वसुली, प्रवास, मिळकत यांसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. सरकारी कामात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ कामाची प्रशंसा करतील. बढती संभवते. पित्याकडून लाभ होईल. संततीच्या शिक्षणासंबंधी समाधान लाभेल. प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा 

कुंभ: शारीरिकदृष्टया थकवा, बेचैनी व उबग जाणवेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. शरीरात स्फूर्ती जाणवणार नाही व त्यामुळे कामात उत्साह वाटणार नाही. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. मौज-मस्ती हिंडण्या - फिरण्यावर खर्च होईल. दूरचे प्रवास घडतील. विदेशातून आनंददायी बातम्या येतील. संतती विषयक समस्या सतावेल. प्रतिस्पर्ध्यांशी जास्त वादविवाद करू नका. आणखी वाचा 

मीन: आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजारावर खर्च होईल. अचानक खर्च वाढतील. इतर कामकाजात प्रतिकूलता जाणवेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. जपून बोला. अचानक धनलाभाने आपला त्रास दूर होईल. मनाला शांती लाभण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणखी वाचा 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Today's Horoscope, April 4, 2026: A brief overview for each zodiac sign.

Web Summary : Daily horoscope for April 4, 2026, offers a glimpse into the fortunes of each zodiac sign. From Aries to Pisces, find out what the stars have in store for you today. Read on to discover more about your daily predictions.
Web Title : आज का राशिफल, 4 अप्रैल, 2026: प्रत्येक राशि के लिए संक्षिप्त विवरण।

Web Summary : 4 अप्रैल, 2026 का दैनिक राशिफल प्रत्येक राशि के भाग्य की एक झलक प्रदान करता है। मेष से मीन राशि तक, जानें कि आज सितारे आपके लिए क्या लेकर आए हैं। अपनी दैनिक भविष्यवाणियों के बारे में अधिक जानने के लिए आगे पढ़ें।
टॅग्स :दैनिक राशीभविष्यफलज्योतिषराशी भविष्यअध्यात्मिक
Open in App