Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०३ ऑगस्ट २०२२: ‘या’ राशीच्या व्यक्तींना लाभप्राप्ती अन् फायदेशीर दिवस

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-08-03 07:22:37 | Updated: August 3, 2022 07:22 IST

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष: आजचा दिवस दूरगामी आर्थिक योजनेसाठी अनुकूल आहे. तसेच आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया फायदेशीर आहे. शारीरिक व मानसिक उत्साहाचा अनुभव होईल. मित्र - स्वकीयां कडून भेटवस्तू मिळतील. त्यांच्या सहवासात वेळ आनंदात जाईल. तसेच त्यांच्यासह एखादा समारंभ किंवा सहलीस जाऊ शकाल. अधिक वाचा

वृषभ: आज वैचारिक पातळीवर थोरपणा व गोड वाणी ह्यामुळे इतरांना प्रभावित करू शकाल. तसेच त्यांच्याशी संबंधात सुसंवाद निर्माण करू शकाल. बैठका, चर्चा ह्यात सुद्धा आपणाला यश मिळेल. कष्टाचे अपेक्षित फळ मिळाले नाही तरी सुद्धा आपण त्या क्षेत्रात प्रगती पथावर राहाल. पचनसंस्थे संबंधी तक्रारी वाढून त्रास होईल. अधिक वाचा

मिथुन: आज मनाची स्थिती दोलायमान राहील. मन द्विधा बनेल. जादा हळवेपणा मनाला बेचैन करेल. आई विषयी अधिक भावनाशील व्हाल. बौद्धिक चर्चेचे प्रसंग येतील पण त्यात वादविवाद टाळावेत. कौटुंबिक व स्थावर संपत्ती विषयी शक्यतो चर्चा टाळावी. स्वकीय व स्नेही यांच्याशी ताण - तणाव संभवतात. शक्यतो प्रवास टाळा. अधिक वाचा

कर्क: आजचा दिवस कामात यश व नव्या कामाचा प्रारंभ ह्यासाठी अनुकूल आहे. मित्र व स्वकीयांचा सहवास आपणाला आनंद देईल. जवळचे प्रवास होतील. भावंडांशी सलोखा राहील. प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल. आर्थिक लाभ व समाजात आदर - सत्कार मिळेल. विरोधकांना पराभूत कराल. कोणाच्या प्रेमात पडाल. अधिक वाचा

सिंह: आज दूरस्थ स्नेही व नातलग ह्यांच्याशी झालेल्या पत्र व्यवहारामुळे लाभ होईल. कुटुंबात सुख शांती नांदेल. स्वादिष्ट भोजन मिळेल. आपले वाक्चातुर्य इतरांची मने जिंकेल. निर्धारित कामात यश मिळेल. आयोजन व अतिविचार संकट निर्माण करतील. स्त्री मित्र मदतरूप ठरतील. अधिक वाचा

कन्या: आज आपल्या वैचारिक समृद्धी व मोहक वाणी ह्यामुळे लाभ होऊन सौहार्दपूर्ण संबंध वाढवून काम पूर्ण कराल. आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक आहे. प्रकृती उत्तम राहील व मन सुद्धा प्रसन्न राहील. आप्तेष्टांशी सुसंवाद साधल्यामुळे सुख व आनंद मिळेल. धनलाभ व प्रवास होईल. अधिक वाचा

तूळ: आज थोडा सुद्धा असंयम व अवैध व्यवहार आपणास अडचणीत टाकेल. एखादी दुर्घटना संभवते. बोलण्यातील शिथीलता उग्र तक्रार वाढवण्याची शक्यता आहे. सगे सोयरे ह्यांच्याशी पटणार नाही. मनोरंजन तसेच फिरण्यात पैसे खर्च होतील. शारीरिक व मानसिक व्यग्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. अधिक वाचा

वृश्चिक: आज नोकरी - व्यवसायात लाभप्राप्ती होईल. मित्रांसह गाठीभेटी, प्रवास ठरवाल. विवाहोत्सुक तरूण तरूणींसाठी चांगली संधी आहे. संतती किंवा पत्नी कडून लाभ होईल. वाडवडील किंवा थोरले बंधू त्या लाभात निमित्तमात्र बनतील. स्नेही मित्र यांच्या कडून भेटवस्तू मिळतील. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. . वैवाहिक जीवनात मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. अधिक वाचा

धनु: आजचा दिवस कार्य साफल्याचा आहे. नवे काम सुरू कराल. व्यापारी आपल्या व्यवसायाचे नियोजन व विस्तार करू शकतील. मैत्रिणींकडून लाभ होईल. नोकरीत वरिष्ठ अधिकारी आपल्या बढतीचा विचार करतील. गृहजीवनात आनंद व समाधान मिळेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळेल. आर्थिक लाभ होतील. सार्वजनिक जीवनात मान - सन्मान वाढेल. अधिक वाचा

मकर: आज बौद्धिक कार्य व व्यवसायात आपण नवी शैली वापराल. साहित्य व लेखन कार्याला गती मिळेल. शारीरिक अस्वास्थ्य व थकवा जाणवेल. संततीची समस्या चिंता वाढवील. दूरचे प्रवास घडतील. विरोधक, प्रतिस्पर्धी यांच्याशी चर्चा तसेच अनावश्यक खर्चापासून दूर राहा. अधिक वाचा

कुंभ: आज अवैध काम व नकारात्मक विचारां पासून दूर राहावे. खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल. आरोग्य बिघडेल. कुटुंबात खडाजंगी होईल. खर्चाचे प्रमाण वाढल्याने आर्थिक चणचण भासेल. ह्यातून सुटका करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहावे. अधिक वाचा

मीन: आज आपण दैनंदिन कामातून बाहेर पडून सहलीसाठी किंवा मनोरंजनासाठी वेळ द्याल. स्वजनांसह सहली साठी जाऊ शकाल. सिनेमा, नाटक किंवा बाहेर भोजन करणे असा एखादा कार्यक्रम आखाल. कलाकार किंवा कारागिराना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल. आजचा दिवस व्यवसायात भागीदारीसाठी अनुकूल आहे. दांपत्य जीवनात अधिक जवळीक निर्माण करता येऊ शकेल. सार्वजनिक जीवनात मान - सन्मान होतील. अधिक वाचा
 

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App