चंद्र आज 29 एप्रिल, 2025 मंगळवार च्या दिवशी वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आजचा दिवस काहीसा वेगळाच आहे. स्वतःसाठी वेळ काढू शकाल. मित्रांसह प्रवास, मौज - मजा, मनोरंजन व एखाद्या सहलीस जाऊन तसेच रुचकर भोजन, वस्त्रालंकार इत्यादींमुळे आज आपण खूप आनंदी राहाल. मान - सन्मानात वाढ होऊन एखादा सत्कार होण्याची शक्यता सुद्धा आहे. वाहनसौख्य मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडल्याने आपले मन प्रफुल्लित होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.