Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - ३० नोव्हेंबर २०२२, नोकरी, व्यवसायात उत्पन्न वाढेल; संतती व पत्नीकडून लाभ होतील

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-11-30 07:40:19 | Updated: November 30, 2022 07:40 IST

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष -  आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल. घराच्या सजावटीत बदल करण्याचा विचार मनात येईल. कार्यालयीन किंवा व्यापारी क्षेत्रातील अधिकारी वर्गाशी महत्वाची चर्चा होईल. सरकारी फायदा मिळण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा

वृषभ -  आज नवीन काम करण्याची प्रेरणा मिळून त्याची आपण सुरुवात सुद्धा करु शकाल. एखादया रमणीय स्थळाला भेट देऊन आपले मन प्रसन्न होईल. दूरचे प्रवास संभवतात. दूरवरच्या मित्रांच्या शुभ बातम्या समजतील. परदेशी जाण्याची संधी लाभेल. आणखी वाचा

मिथुन - आज संतापाची भावना आपले नुकसान करेल. आजारी व्यक्तींची तपासणी किंवा शस्त्रक्रिया करावी लागेल. मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रकृती बिघडेल. मानसिक दृष्टया निराश व्हाल.  आणखी वाचा

कर्क  -  आज संवेदनशीलता व प्रेमाने व्याप्त होऊन आपले मन भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित होईल. मौल्यवान मौज - मजेच्या वस्तू, वस्त्राभूषणे तथा वाहन इत्यादींची खरेदी होईल. दांपत्य जीवन उत्तम राहील. आणखी वाचा

सिंह - आज उदासीनता व साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल. दैनंदिन कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. खूप परिश्रम कराल पण त्यामानाने कमी फळ मिळेल. नोकरीत सांभाळून राहा. सहकारी फारसे सहकार्य करणार नाहीत. आणखी वाचा  

कन्या -   आजचा दिवस चिंता व उद्वेगाने भरलेला असेल. पोटाच्या त्रासामुळे प्रकृती बिघडेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. अचानक धनखर्च होईल. बौद्धिक चर्चेत असफल व्हाल. प्रियव्यक्तीचा सहवास लाभेल. आणखी वाचा

तूळ -   आज सावध राहावे लागेल. वैचारिक सुज्ञपणा मानसिक स्वास्थ्य देईल. माता व स्त्री वर्गाची चिंता राहील. आज शक्यतो प्रवास स्थगित ठेवा. वेळेवर भोजन व पुरेशी झोप न मिळाल्याने शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. आणखी वाचा

वृश्चिक -  आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील. नशिबाची साथ मिळेल. भावंडांशी कौटुंबिक चर्चा व नियोजन होईल. तन - मन स्फूर्ती व चैतन्याने भरून जाईल. मित्र, सगे सोयरे यांचे आपणाकडे येणे झाल्याने आपण आनंदी राहाल. आणखी  वाचा

धनु - आज कुटुंबीयांशी गैरसमज व मतभेद होतील. वायफळ खर्च होईल. मानसिक चंचलता व द्विधा मनःस्थिती ह्यामुळे महत्वाचे निर्णय आज आपण घेऊ शकणार नाही. कामात अपेक्षित यश मिळणार नाही.  आणखी वाचा

मकर -  आजच्या दिवसाची सुरवात प्रसन्न वातावरणाने होईल. घरात मंगलमय वातावरण राहील. मित्र तसेच सगेसोयरे यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. कामे सहजपणे पूर्ण होतील. नोकरी - व्यवसायात लाभ होईल.  आणखी वाचा

कुंभ -  आज शक्यतो आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार करू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. स्वकीयांशी मतभेद होतील.  आणखी वाचा

मीन -   आज समाजात सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त कराल. सामाजिक कामात भाग घ्यावा लागेल. वडिलधारी व मित्रांचा सहवास लाभेल. मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल. नोकरी - व्यवसायात उत्पन्न वाढेल. संतती व पत्नीकडून लाभ होतील.  आणखी वाचा

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App