Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - ६ डिसेंबर २०२२, या राशीतील व्यक्तींना पगारवाढ किंवा नोकरीत प्रमोशन

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-12-06 07:31:01 | Updated: December 6, 2022 07:31 IST

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष - आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. सगळ्या कामात यश मिळाल्याने आपण खूप आनंदी व प्रसन्न व्हाल. आर्थिक लाभ सुद्धा होईल.  आणखी वाचा 

वृषभ - आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आज सावध राहावे लागेल. आपले मन अनेक प्रकारच्या चिंतांनी व्यग्र असेल. स्वास्थ्यही जरा नरमच राहील. विशेषतः डोळ्यांचा त्रास संभवतो.  आणखी वाचा

मिथुन - आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आज विविध मार्गांनी लाभ झाल्यामुळे हर्षोल्हास वाढेल. पत्नी व संततीकडून फायदेशीर बातमी मिळेल. आणखी वाचा

कर्क -  आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आज नोकरीत वरिष्ठांच्या प्रोत्साहनाने आपला उत्साह द्विगुणित होईल. पगारवाढ किंवा पदोन्नती झाल्यास आश्चर्य वाटायला नको. आई तसेच इतर कुटुंबीय ह्यांच्याशी सौहार्दाचे संबंध राहतील. आणखी वाचा

सिंह -  आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आळस, थकवा व ऊबग आपल्या कामाचा वेग कमी करतील. पोटाच्या तक्रारी मुळे अस्वस्थता अनुभवाल. आणखी वाचा

कन्या -  आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज 'मनावर संयम ठेवावा लागेल. स्वभावांतील उग्रतेमुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. हितशत्रू विघ्न उपस्थित करतील. आणखी वाचा

तूळ -  आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आज दैनंदिन कामाच्या व्यापातून जरा हलके वाटावे म्हणून आपण मेजवानी, सिनेमा किंवा पर्यटन ह्यांची योजना आखून मित्रांना आमंत्रित कराल.  आणखी वाचा 

वृश्चिक -  आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस सौख्यदायी आहे. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवू शकाल. शारीरिक स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता अनुभवाल. आणखी वाचा

धनु -  आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपण संततीचा अभ्यास व स्वास्थ्य ह्यामुळे चिंतीत व्हाल. पोटाच्या तक्रारी सतावतील. कामातील अपयशाने आपण निराश व्हाल. आणखी वाचा 

मकर - आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आज उत्साह व स्फूर्ती ह्यांचा अभाव असल्याने अस्वस्थता वाटेल. मनाला चिंता लागून राहील. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मन खिन्न होईल. आणखी वाचा

कुंभ -  आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपणास मोकळेपणा जाणवेल. शारीरिक स्वास्थ्य आपला उत्साह वाढवेल. शेजारी व भावंडांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होतील. आणखी वाचा

मीन -   आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आज खर्च, संताप व जीभ यावर संयम ठेवावा लागेल. कोणाशी भांडण होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार व पैश्यांच्या देवाण - घेवाणीत सावध राहावे.  आणखी वाचा

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्यराशिभविष्य २०२१
Open in App