Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २ डिसेंबर २०२२, प्रत्येक गोष्ट अनुकूल राहील, घरात सुख-शांती नांदेल, आर्थिक लाभ होतील

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-12-02 07:29:53 | Updated: December 2, 2022 07:29 IST

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष -    आजचा दिवस समाजकार्य व मित्रांसोबत धावपळीत जाईल. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. सरकारी कामात मात्र यश मिळेल. वडीलधारी व आदरणीय व्यक्तींचा सहवास लाभेल.  आणखी वाचा 

वृषभ -  आज आपण नवे काम सुरू करू शकाल. नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे. नोकरीत पदोन्नती व पगार वाढीची बातमी मिळेल. सरकार कडून लाभ मिळेल. सांसारिक जीवनात सुख - शांती मिळेल.  आणखी वाचा

मिथुन - आज दिवसभर थोडया प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल. शरीरात उत्साहाचा अभाव राहील. त्यामुळे नियोजित काम पूर्ण होणार नाही. मानसिक चिंता राहील. नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्‍यांचा मंद प्रतिसाद आपला उत्साहभंग करेल. आणखी वाचा

कर्क  -  आज संताप व नकारात्मक विचार मानसिक स्वास्थ्य हरवून टाकतील. त्यामुळे आज संयम राखणे आवश्यक आहे. खाण्या - पिण्याकडे लक्ष दिले नाही तर प्रकृती नक्कीच बिघडेल. कुटुंबात वादविवाद होतील.  आणखी वाचा

सिंह -  आज आपल्या दांपत्य जीवनात किरकोळ गोष्टीवरून जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. पति - पत्नी दोधांपैकी एकाची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. परिणामतः प्रापंचिक गोष्टी पासून मन अलिप्त होईल.  आणखी वाचा    

कन्या -  आज प्रत्येक गोष्ट अनुकूल राहील. घरात सुख - शांती नांदेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. सुखदायक घटना घडतील. प्रकृती उत्तम राहील. आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल. आर्थिक लाभ होतील. आणखी वाचा

तूळ -     आज आपण बौद्धिक कामे व चर्चा यांत अग्रस्थानी राहाल. आपली कल्पनाशक्ती व सृजनशक्ती यांतील प्रगती समाधान देईल. विनाकारण वाद - विवाद व चर्चेत पडू नका.  आणखी वाचा 

वृश्चिक -  आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जाणवेल. वडीलधार्‍यांशी पटणार नाही व त्यामुळे मनाला वेदना होतील. आईची प्रकृती बिघडू शकते. आर्थिक नुकसान व सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होईल. आणखी वाचा

धनु -   आज आपणास एखाद्या गूढ विद्येचे आकर्षण वाटेल. भावंडांशी चांगले संबंध राहतील. नवीन कार्यारंभ करण्यासाठी अनुकूलता लाभेल. मित्रमंडळींशी संपर्क होऊ शकेल. कामात यश मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. आणखी वाचा 

मकर - आज संयमित बोलणे आपणाला अनेक संकटातून वाचवेल. म्हणून विचारपूर्वक बोला. कुटुंबियांशी गैरसमज झाल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. शेअर सट्टा यांत पैसे गुंतविण्याचे नियोजन कराल. आणखी वाचा

कुंभ -   आजचा दिवस शारीरिक व मानसिक स्वास्थ्य व उत्साहाचा आहे. आर्थिक दृष्टया लाभदायक दिवस आहे. आप्तेष्ट व मित्र यांच्यासह रुचकर व स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. एखाद्या पर्यटनाचा बेत ठरवाल. आणखी वाचा

मीन -    आज आपल्या मनाची एकाग्रता राहिल्यामुळे मानसिक व्यग्रता जाणवेल. मंगल कार्यावर खर्च होईल. स्वकीयांपासून दूर जावे लागेल. कोर्ट - कचेरीच्या कामात किंवा एखाद्याला जामीन राहण्याच्या बाबतीत खूप सावधपणे वागा.  आणखी वाचा

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App